Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

भूरूनकीची ग्रामसभा नोडल अधिकार्‍यांच्या गैरहजेरीमुळे लांबली!

खानापूर (वार्ता) : तालुक्यातील गावाचा विकास व्हावा. म्हणून तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु भुरूनकी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीची ग्रामसभा केवळ नोडल अधिकार्‍यांच्या गैरहजेरीमुळे सोमवारी दि. 10 रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा रद्द करण्यात आली. ग्रामसभा म्हणजे सामान्य नागरिकांना मिळणारा न्याय असतो. म्हणून ग्राम पंचायतीच्या …

Read More »

खानापूर आश्रय कॉलनीतील धोकादायक ट्रान्सफॉर्म हलवा

खानापूर (वार्ता) : खानापूर शहरातील वॉर्ड नंबर 1 मधील आश्रय कॉलनीमध्ये रहदारीच्या ठिकाणी उभारण्यात आलेला विद्युत्त खांब्यावरील ट्रान्सफॉर्म बदलण्याची मागणी वॉर्ड नंबर एक मधील आश्रय कॉलनीतील नागरिकांनी तहसील कार्यालय, हेस्कॉम खाते तसेच नगरपंचायातीच्या अधिकारी वर्गाना निवेदन देऊन केली. निवेदनात म्हटले आहे की, वॉर्ड नंबर एक मधील आश्रय कॉलनीमध्ये 11000 व्हॅटची …

Read More »

‘जय किसान’बाबत चौकशी करून सरकारला अहवाल : जिल्हाधिकारी

बेळगाव (वार्ता) : गांधीनगरनजीक सुरू करण्यात आलेले जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या बाबतीत ज्या तक्रारी आहेत त्याची चौकशी करून सरकारला अहवाल पाठविला जाईल आणि तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मंगळवारी झालेल्या खाजगी भाजी मार्केट आणि …

Read More »

खासगी भाजीमार्केट बंद करण्यासाठी एल्गार

बेळगाव (वार्ता) : बेळगावात बेकायदेशीररीत्या उभारलेले खासगी जयकिसान होलसेल भाजी मार्केट बंद करावे, त्याला बेकायदा परवानगी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटना आणि भाजी व्यापार्‍यांनी आज एपीएमसीसमोर भव्य आंदोलन केले. खासगी होलसेल भाजीमार्केटच्या माध्यमातून बेकायदा खासगी एपीएमसी सुरु करण्यास परवानगी दिल्याचे संतप्त पडसाद बेळगावात उमटत आहेत. त्याविरोधात …

Read More »

प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती!

बेळगाव (वार्ता) : शेतकर्‍यांची जमीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर कार्यालयासाठी ताब्यात घेऊन तब्बल 41 वर्षे झाली तरी संबंधित शेतकर्‍याला नुकसान भरपाई न दिल्यामुळे आज मंगळवारी न्यायालयाने प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती आदेश बजावला. त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व साहित्य आज रस्त्यावर आले होते. न्यायालयाच्या जप्ती आदेशानुसार बेळगाव प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व साहित्य आज …

Read More »

नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यूचा जानेवारी अखेरपर्यंत विस्तार

कोविड नियंत्रणासाठी निर्बंध; लॉकडाऊनचे भवितव्य गुरुवारी बंगळूर (वार्ता) : कर्नाटक सरकारने मंगळवारी विद्यमान नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू जानेवारीच्या अखेरीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. कोविड संसर्गाचा वाढता प्रसार व राज्याची 10.30 टक्क्यांवर गेलेली सकारात्मकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. विद्यमान निर्बंध 19 जानेवारी रोजी संपणार होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या …

Read More »

विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर शाळाबंदीचे सावट!

12 हजारांचे उद्दिष्ट : आठवड्याभरात केवळ 40 टक्के लसीकरण निपाणी (वार्ता) : आरोग्य विभागाच्या वतीने 15-18 वयोगटातील शाळाकरी विद्यार्थ्यांना लसीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने शासनाने शाळा बंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यात अद्याप असा आदेश काढण्यात आला नसला तरी येत्या काही दिवसात त्याची शक्यता …

Read More »

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन

राजू पोवार : रयत संघटनेतर्फे वनाधिकार्‍यांना निवेदन निपाणी (वार्ता) : गेल्या महिन्यापासून शेंडूर व परिसरातील डोंगरी भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्याकडून ऊसासह इतर पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय शेतकर्‍यांमध्ये ही या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल, …

Read More »

संकेश्वर बाजारात ट्रॉफिक जाम…!

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरची प्रमुख बाजारपेठ आज ट्रॉफिक जाम झालेली दिसली. शनिवार, रविवार विकेंड कर्फ्युमुळे जुना पी. बी. रस्ता ते कमतनूर वेस तसेच गावात सर्वत्र शुकशुकाट होता. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बाजारात किराणा वस्तू, तसेच अन्य वस्तू पोच करण्यासाठी वाहने रस्त्यावर उभी करण्यात आल्यामुळे दुचाकी-चारचाकी वाहने लोकांच्या गर्दीत फसलेली पहावयास …

Read More »

सहकार शिल्पी दिवंगत बसगौडा पाटील यांना अभिवादन

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्थेतर्फे सहकार शिल्पी, शिक्षणप्रेमी दिवंगत बसगौडा पाटील यांचा जन्मदिवस आचरणेत आला. शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी बसगौडा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बसगौडा पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या हस्ते एस. एस. कला आणि …

Read More »