Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

हिरेबागेवाडी येथे भीषण अपघातात 3 ठार

बेळगाव (वार्ता) : हिरेबागेवाडीजवळील विरप्पनकोप क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. अपघातातील तीघेही मृत यल्लापूर (जि. कारवार) येथील रहिवासी होते. याबाबतची माहिती अशी की, धारवाड येथून बेळगावच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार विरप्पनकोप क्रॉस जवळ आली असता रस्त्यात थांबलेल्या एका ट्रकवर जोराने आदळली. …

Read More »

बेळगावात सुवर्णसौध बांधण्याचा उद्देश फसला : कुमारस्वामी यांची कबुली

बेळगाव (वार्ता) : ज्या कारणासाठी बेळगावात सुवर्णसौध उभारली, अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला तो उद्देश सफल झालेला नाही अशी कबुली माजी मुख्यमंत्री व जेडीएस अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. अधिवेशनात भाग घेण्यासाठी मंगळवारी बेळगावात आल्यावर कुमारस्वामी यांनी चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जेडीएस नेते …

Read More »

धर्मांतर बंदी विधेयकावरून विधानसभेत काँग्रेस आक्रमक, आमदारांनी केला सभात्याग

धर्मांतर विरोधी विधेयकावर आज होणार चर्चा बेळगाव (वार्ता) : गेल्या महिन्यापासून चर्चेत असलेल्या धर्मांतर बंदी कायदा विधेयक आज मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सत्ताधारी पक्षाने आडमार्गाने सदनात विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या विधेयकाला आमचा विरोध आहे असे सांगून संताप व्यक्त केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीवरील बंदीची चर्चा; शिवसेनेचं कर्नाटक सरकारला थेट आव्हान!

मुंबई : बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार घडल्यानंतर बेळगावसहीत सीमाभागांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन केलं. मात्र या आंदोलनानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्यासंदर्भात कर्नाटक सरकार विचार करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असं असतानाच यासंदर्भात शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत …

Read More »

कर्नाटकमध्ये पुन्हा नेतृत्वबदल होणार?

मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्काला उधाण! बेंगळुरू : काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतलेल्या बसवराज बोम्माई यांची पदावरून उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 28 जुलै रोजी बसवराज बोम्माई यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या उचलबांगडीनंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली होती. मात्र, आता …

Read More »

उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन; सत्ताधारी आणि विरोधकांची खलबतं

मुंबई : उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक …

Read More »

भाजप आमदारांनी रामाची, विठोबाची जागा लाटली; नवाब मलिकांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यभरात देवस्थानांच्या जमिनीचा घोटाळा सुरु आहे आणि या घोटाळ्यास भाजपचे मंत्री जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचंही नवाब मलिकांनी सांगितलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बोलताना …

Read More »

पायोनियर अर्बन बँकेला 96 लाखाचा नफा : चेअरमन प्रदीप अष्टेकर यांची माहिती

बेळगाव (वार्ता) : ’येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 95 लाख 84 हजार रुपयाचा निव्वळ नफा झाला असून बँकेकडे 94 कोटी 14 लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. कोरोनामुळे सर्वत्र घडी विस्कटली असली तरीही बँकेने आपल्या प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे’ अशी माहिती पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री. …

Read More »

महिलांनी मुलांच्या आरोग्याबरोबर आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. राजश्री अनगोळ

बेळगाव (वार्ता) : मुलांच्या आरोग्याची व सर्व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी सर्व महिला घेत असतात. महिलांनी मुलांच्या आरोग्याबरोबर आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असे उद्गार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ यांनी काढले. तारांगण व संजना मेहंदी डिझायनर तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रेसिडेंट डॉ. राजश्री अनगोळ यांचा सत्कार समारंभ व शिल्पा …

Read More »

कन्नड भाषा शिकायला हवी : अमर नलवडे

संकेश्वर (वार्ता) : आपण कर्नाटक राज्यात राहत असल्याने येथील कन्नड भाषा लिहायला, वाचायला शिकायला हवी असल्याचे संकेश्वर मराठा समाज सोसायटीचे अध्यक्ष अमर नलवडे यांनी सांगितले. ते सोसायटीच्या 14 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित मराठा समाजाती दहावी-बारावी परिक्षेची व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्काराने सन्मान करुन बोलत होते. उपस्थितांचे स्वागत जयप्रकाश सावंत यांनी …

Read More »