Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

एंजल फाउंडेशनच्यावतीने डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण

बेळगाव : एंजल फाउंडेशनच्यावतीने भांदूर गल्ली येथे डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून त्यामध्ये डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे . डेंग्यू व चिकनगुनिया या रोगांचेही प्रमाण वाढत आहे. याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला एंजल फाउंडेशनचे …

Read More »

राष्ट्रीय स्पर्धेत साई तायक्वांदोचे सुयश

बेळगाव ‘ बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या व्हीफा कप राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत काकती येथील साई तायक्वांदो इन्स्टिट्यूटच्या 5 विद्यार्थ्यांनी अभिनंदन यश मिळविले आहे. बेंगलोर येथे गेल्या 2 आणि 3 जुलै रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत साई तायक्वांदो इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी फाईटमध्ये तीन सुवर्ण तर दोन कांस्य पदकं …

Read More »

पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत आवाज उठवावा!

फिरोज चाऊस : दोशी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात दहावी परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे सदस्य प्रशांत गुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे अध्यक्ष फिरोज चाऊस होते. फिरोज चाऊस म्हणाले, विद्यार्थ्यांना या विद्यालयात शिकायला मिळाले …

Read More »

नवनियुक्त नगरनियोजन सदस्य विश्वनाथ जाधव यांचा सत्कार

 निपाणी (वार्ता) : येथील नगरनियोजन समितीच्या सदस्यपदी शासनावतीने नियुक्त करण्यात आलेले सदस्य विश्वनाथ जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. येथील गुडमॉर्निंग वॉकिंग ग्रुप वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी निपाणी नगरपालीकेचे माजी सभापती संदीप कामत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या पदाच्या माध्यमातून शहराच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही जाधव …

Read More »

भारतासमोर विजयाचे टार्गेट, इंग्लंडविरुद्ध आज पहिला टी-20 सामना

साऊथम्टन : हिट मॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (गुरुवार) साऊथम्टनमधील रोझ बाऊल स्टेडियमवर रंगणार आहे. पाचव्या कसोटी सामन्यात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. मात्र, यासाठी भारतीय संघाला सर्व आघाड्यार …

Read More »

शाहू महाराजांनी 138 वी जयंती साजरी

बेळगाव : अखिल भारतीय सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद व यलगार परिषद आणि महाराष्ट्र शिक्षण महामंडळ बी. के. कॉलेज माजी विद्यार्थी संघटना जेके फाउंडेशन यांच्यावतीने साजरी करण्यात आली. जत्तीमठात झालेल्या कार्यक्रमात वकील उदयसिंग फडतरे निंबाळकर, माजी नगरसेवक अनिल पाटील, भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्रा. सुनील ताटे, प्रा. निलेश शिंदे, खानापूरचे उद्योजक सुनील …

Read More »

निपाणीत आज पोलिस ठाणे इमारतींचे उद्घाटन

गृहमंत्र्यांची उपस्थिती : प्रशासनाकडून तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : येथील मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शहर व ग्रामीण या दोन पोलिस ठाण्यांच्या नूतन सर्व सोयींनी युक्त इमारतींचे बांधकाम आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. या इमारतींचे उद्घाटन गुरूवारी (ता. ७) सकाळी १० वाजता धर्मादाय खात्याचा मंत्री शशिकला जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली होणार …

Read More »

यंदाच्या पूरस्थिती पूर्वीच योग्य नियोजन करा

राजू पोवार : रयत संघटनेने घेतली तहसीलदारांची भेट निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील पावसाला निपाणी तालुक्यात सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वेदगंगा, दूधगंगा आणि पंचगंगा नद्यांची पाणीपातळीही वाढल्याने आठवड्याभरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. तसेच …

Read More »

पीटी उषा, वीरेंद्र हेगडे यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर वर्णी

नवी दिल्ली : धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलैय राजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या चार जणांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा, व्ही. विजयेंद्र प्रसाद गरु, वीरेंद्र हेगडे आणि इलैया राजा यांचे …

Read More »

पीयु अतिथी प्राध्यापकांच्या वेतनात १२ हजार रुपयापर्यंत वाढ

बंगळूर : कर्नाटकातील सरकारी पदवीपूर्व (पीयु) महाविद्यालयातील अतिथी व्याख्यात्यांच्या मानधनात सुधारणा केल्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला असून, त्यांच्या मानधनात नऊ हजार रुपयावरून १२ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाने सांगितले की, चालू वर्षात व्याख्यात्यांची कमतरता दूर करण्यासाठी तीन हजार ७०८ अतिथी व्याख्याते भरले जात आहेत. याबाबतची …

Read More »