Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

क्रांतीसाठी समाजव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आवश्यक : प्रा. डॉ. अच्युत माने

समता सैनिक दलातर्फे अभिवादन निपाणी : निपाणी परिसर हा क्रांतिकारकांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. अजूनही काही प्रमाणात दलित, शोषित, पीडित आणि शेतकर्‍यांवर अन्याय सुरुच आहे. त्यामुळे समाजात बदल करण्यासाठी तरुणांची फौज आवश्यक आहे. सामान्य माणूस हाच क्रांतीचा आधार आहे. 70 वर्षानंतर हे अपेक्षित स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्यामुळे दुसर्‍या स्वातंत्र्याची गरज …

Read More »

विधानपरिषद निवडणूक सुरळीत पार पाडा

मोहन भस्मे : निपाणी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम निपाणी : शुक्रवारी (ता. 10) होणार्‍या विधान परिषद निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी केले. येथील केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी कॉलेजमध्ये आयोजित पीआरओ व एपीआरओ निवडणूक कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देताना ते बोलत होते. प्रारंभी …

Read More »

दत्त कारखान्यातर्फे बोरगांवमध्ये ’शुगर बीट’ शेती!

कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर लागवड : एफआरपीप्रमाणे देणार दर निपाणी : अतिवृष्टी आणि महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने शुगर बीट लागवडीचा नवा पॅटर्न आणला आहे. बोरगाव कार्यक्षेत्रात सुमारे 5 एकरहून अधिक तर कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर शुगर बीटची लागवड करण्यात आलेली आहे. केवळ चर्चाच …

Read More »

पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध होतो : प्रा. विनोद गायकवाड

बाल-शिवाजी वाचनालयाचा 48 वा वर्धापन दिन साजरा बेळगाव : ‘वाचल्यामुळे ज्ञान वाढते तर न वाचल्यामुळे अज्ञान वाढते. चांगली पुस्तके ही आपली गुरू आहेत. पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध होतो. मच्छे गावात अनंत लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 48 वर्षांपूर्वी ज्या वाचनालयाचे रोपटे लावले त्याचा आज वटवृक्ष झाला आहे.’ असे विचार राणी चन्नम्मा …

Read More »

क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ठरला समितीला बळ देणारा

खानापूर : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीतजास्त स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक असून येणार्‍या काळात महाराष्ट्र एकीकरण समिती अधिक सक्षमपणे लढा पुढे घेऊन जाईल, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात समितीच्या बळकटी करणावर भर देण्यात आल्याने हलशीवाडी येथे समितीचा मेळावा भरल्याचे …

Read More »

नियम कडक करताच मास्कची मागणी वाढली

विविध आकारासह रंगसंगती : महिलांचा कल मॅचिंगकडे निपाणी : राज्य सरकार तसेच प्रशासनाकडून मास्क वापराची सक्ती केल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांकडून मास्कची मागणी वाढली आहे. निपाणी बाजारपेठेत ठिकठिकाणी रंगबिरंगी विविध प्रकारच्या मास्कचे दुकाने सजली आहेत. महिलांकडून विशेषत: मॅचिंग मास्क खरेदीकडे कल वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन विषाणू आढळला आहे. केंद्र …

Read More »

पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यतत्परतेमुळे अनर्थ टळला

बेळगाव : बेळगाव जाधवनगर येथील एनसीसी मुख्यालयासमोर एक विद्युत खांबाला जोडलेली विद्युतभारित वायर तुटून पडली होती. हा प्रकार लक्षात येताच कॅम्प पोलीस स्थानकाचे अधिकारी विनोद महालमनी यांनी लागलीच हेस्कॉम अधिकार्‍यांना याची कल्पना दिली. हेस्कॉमने तातडीने दाखल होत त्या तुटलेल्या वायरचा भाग पुन्हा जोडला असून अनर्थ टाळला गेला आहे. एक जर्मन …

Read More »

निपाणीत ‘नेसा’तर्फे मॅरेथॉन स्पर्धा

1630 स्पर्धकांचा सहभाग : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी : मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वयामध्ये कोणत्याही गोष्टीचा केव्हाही व कोठेही कसाही अस्वाद घेऊ शकतो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करून अनेक गरुड भरार्‍या घेऊ शकतो. पण हे सर्व करत असताना त्याचे आरोग्य जर त्याला साथ देत नसेल तर हे सर्व हवेत …

Read More »

जांबेगाळीच्या शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : जांबेगाळी (रेडेकुंडी) (ता. खानापूर) येथील शेतकरी प्रकाश बाळकृष्ण देसाई (वय 46) हे आपल्या बैलगाडीतून शेतात मळणी केलेले भात आणण्यासाठी शनिवारी दि. 4 रोजी सायंकाळी जात असताना बैलगाडी पलटी झाल्याने प्रकाश देसाई यांना जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक …

Read More »

बुद्धिबळपटूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित बुद्धिबळ महोत्सवात गोल्डन चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. आठ वर्षांखालील वयोगटात मुलांच्या विभागात गीतेश सागेकर याने दुसरा क्रमांक तर सुयश उडकेरी याने तिसरा क्रमांक पटकाविला. दहा वर्षांखालील वयोगटातील मुलांच्या विभागात अनिरुद्ध दासरी याने पहिला तर गितेश सागेकर याने दुसरा क्रमांक …

Read More »