खानापूर : आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीत हजारो वारकरी सहभागी होण्यासाठी जात असतात. संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाचे वारकरी दक्षिण गोवा ते पंढरपूर पर्यंत पायी दिंडी जाणार आहेत. दिंडीची सुरुवात दक्षिण गोव्यातून करून बाली, सावर्डे, धडे, मोलम, अनमोड, अखेती, मेरडा आदी मार्गाने येऊन मणतुर्गा येथे आज सायंकाळी आगमन …
Read More »ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांना “लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार” जाहीर
कोल्हापूरच्या तीन पत्रकारांना राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर कोल्हापूर : शासनाच्या वतीने सन 2019 ते 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 2023 साठी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांना हा पुरस्कार जाहीर …
Read More »तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नेमणूक करावी; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत ठराव
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज दि. 24 जून रोजी मराठा मंदिर येथे पार पडली. सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समिती व तज्ञ समितीच्या पुर्नरचनेच्या पार्श्वभूमीवर सदर बैठक बोलाविण्यात आली होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर हे होते. या बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारच्या …
Read More »बेळगाव आणि खानापुरात उद्या शाळांना सुट्टी
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहर परिसरात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सरकारी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व कॉलेजला उद्या बुधवार दि. 25 जून रोजी असणार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबतची सूचना प्रसिद्धीस दिली आहे.
Read More »“ऑल इज वेल” चित्रपटातील कलाकारांना बेळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद!
बेळगाव : २७ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटाची टीम आज बेळगावात दाखल झाली आणि त्यांनी बेळगावातील लोकांना मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. प्रियदर्शन जाधव आणि योगेश जाधव दिग्दर्शित आणि प्रसिद्ध बहुभाषिक कलाकार सयाजी शिंदे, अभिनय भेर्डे, रोहित हळदीकर, नक्षत्र मेढेकर, सायली फाटक …
Read More »मॉडेल शाळा येळ्ळूर येथे नूतन हायटेक शौचालयाचे उद्घाटन
येळ्ळूर : येथील सरकारी उच्च प्राथमिक मॉडेल शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांच्या वतीने नूतन शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. आयु फाउंडेशन, बेलगाम आणि क्वालिटी ॲनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त सी. एस. आर. फंडातून हायटेक शौचालयाची उभारणी करण्यात आली. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध वेळेमध्ये शौचालयास …
Read More »लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट; आजी-आजोबांसोबत लुटला मनमुराद आनंद!
बेळगाव : लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. आपल्या या भेटीप्रसंगी अभिनेते शिंदे यांनी साधलेला संवाद आणि केलेल्या मनोरंजनाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना अत्यानंद मिळवून दिला. शांताई वृद्धाश्रमातील संवादादरम्यान सयाजी शिंदे यांनी सर्व आजी-आजोबांना त्यांचा आगामी चित्रपट “ऑल इज वेल” पाहण्यासाठी आमंत्रित केले. मी तुमच्या सहवासाचा …
Read More »राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्त छापा!
बेळगाव : आज सकाळी राज्यातील विविध ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाचवेळी अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून दणका दिला. बेळगाव, शिमोगा आणि चिक्कमंगळुरू जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली. छाप्यादरम्यान सापडलेली संपत्तीही जप्त केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बेंगळुरूमध्ये, बीबीएमपीचे कार्यकारी अभियंता प्रकाश यांच्या घरावर छापे टाकण्यात …
Read More »इराण- इस्त्रायलमधील युद्ध थांबले; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीबाबत एकमत झाल्याचा दावा केला आहे. 12 दिवसांनंतर दोन्ही देश युद्ध थांबवण्यास तयार झाले आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर म्हटले आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराण-इस्त्रायल संघर्ष तीव्र होण्याची शक्यता होती. 13 जून रोजी …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, इस्त्रायलसोबत शस्त्रसंधीबाबत दिले स्पष्ट उत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीबाबत एकमत झाल्याचा दावा केला आहे. परंतु इराणकडून त्यांचा हा दावा फेटाळण्यात आला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याचा दावा फेटाळला. सध्या असा कोणताही करार झालेला नाही, असे अराघची यांनी म्हटले आहे. भारत पाकिस्तान दरम्यान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta