Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

तब्बल १२ वर्षांनंतर आसाराम बापूला जामीन मंजूर…

  जोधपूर : २०१३ च्या बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. २०१३ मध्ये आसारामला त्याच्या जोधपूर आश्रमात १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. जोधपूरच्या ट्रायल कोर्टाने ८६ वर्षीय आसाराम बापूला आयपीसीच्या कलम ३७६, पोक्सो कायदा आणि बाल न्याय …

Read More »

भ्रष्टाचार आणि काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू : सी. टी. रवी यांचा हल्लाबोल

  बेळगाव : भ्रष्टाचार आणि काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भ्रष्टाचार सोडल्यास काँग्रेस नाही आणि काँग्रेस सोडल्यास भ्रष्टाचार नाही, असे विधान परिषदेचे सदस्य सी. टी. रवी यांनी केले असून राज्यातील काँग्रेस सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. हा काही …

Read More »

बेळगाव पोस्ट ऑफिसमध्ये ‘एपीटी 2.0’ सेवेचा शुभारंभ

  बेळगाव : भारतीय टपाल खात्याने देशभरातील ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी 2.0’ लागू केली आहे. याच नव्या सेवेचा आज बेळगावच्या प्रधान टपाल कार्यालयात शुभारंभ करण्यात आला. बेळगाव प्रधान टपाल कार्यालयाचे अधीक्षक एस.के. मुरनाळ, सहायक अधीक्षक एस.डी. काकडे, बी.पी. माळगे आणि पोस्टमास्टर लक्ष्मण चावडीमनी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत …

Read More »

चौथ्या गेटजवळील सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणाची मागणी तीव्र

  बेळगाव : बेळगावातील चौथ्या रेल्वे गेटवरील वाहतूक थांबवून भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, स्थानिकांनी आरोप केला आहे की, सुरुवातीला सांगितलेली योजना वेगळी होती आणि आता प्रत्यक्षात काम वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. त्यांनी सर्व्हिस रोड आणखी रुंद करण्याची मागणी केली आहे. बेळगावातील चौथ्या रेल्वे गेटवरील वाहतूक एका …

Read More »

हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका; उच्चदाबाच्या वीज प्रवाहामुळे उपकरणे, वायरिंग जळाली

  बेळगाव : हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीच्या वेळी केलेल्या चुकीमुळे हाय व्होल्टेज करंट अर्थात उच्चदाबाचा वीज प्रवाह निर्माण होऊन अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील कांही घरे आणि दुकानांमधील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या …

Read More »

काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भाजपचा हल्लाबोल

  बेळगाव : देशात आणीबाणी लागू होऊन पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहरातील महावीर भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार जगदीश शेट्टर, माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सी.टी. रवी, आ. अभय पाटील यांनी कार्यक्रमाला संबोधति केले. संविधानाला २५ वर्षे लागली तेव्हा देशात आणिबाणी लावण्यात आली, हा संविधानावील …

Read More »

कौतुकाची थाप दिल्याने भविष्य उज्ज्वल होईल : वाय. पी. नाईक

  बिजगर्णी : विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक आहे.अवांतर वाचन केल्यास आयुष्य समृद्ध बनते. विधायक कार्य करीत रहा. अभ्यास केल्यानं करिअर घडते विद्यार्थी दशेत अवांतर वाचन करून आपलं समृद्ध करा. सातत्य जिद्द, चिकाटीने परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका. ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. कौतुक करणं, प्रोत्साहन प्रेरणा देणं …

Read More »

मुडलगी तालुक्यातील अडवीसिद्धेश्वर मठाचे स्वामीजीवर अवैध संबंधाचा आरोप

  बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर गावातील अडवीसिद्धेश्वर मठाचे स्वामीजी यांच्यावर अवैध संबंध असल्याचा आरोप झाल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांनी स्वामीजींना मठाच्या बाहेर काढले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी, विजापूर जिल्ह्यातील तालीकोटी येथील एक महिला तिच्या मुलीसह अडवीसिद्धेश्वर मठात आली. रात्री १० वाजता स्थानिक तरुणांनी त्या महिलेला स्वामीजींच्या खोलीत …

Read More »

कृष्णा नदीच्या प्रवाहामुळे चिक्कोडी परिसरातील ७ पूल पुन्हा पाण्याखाली!

  बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाटात मुसळधार पाऊस पडत आहे आणि कृष्णा नदीत पाण्याचा प्रवाह एक लाख क्युसेकने वाढला आहे. त्यामुळे बेळगावमधील अनेक ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा नदीच्या प्रवाहामुळे चिक्कोडी परिसरातील ७ पूल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा आणि तिच्या उपनद्यांच्या प्रवाहामुळे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत …

Read More »

मण्णूर येथील मातोश्री सौहार्द सहकारी संघ (सोसायटी)चे थाटात उद्घाटन

  बेळगाव : गोरगरीब जनता बचत करून पैसे संस्थेमध्ये ठेवते. त्यामुळे या पैशांचा योग्य विनिमय करून त्याचा मोबदला ठेवीदारांना देणे गरजेचे आहे. संस्थेच्या कारभारात पारदर्शकता असणेही आवश्यक आहे, संस्थेच्या संचालकांची  ठेवीदार, सभासदांना विश्वासात घेऊन कार्य केले तरच संस्था विश्वासास पात्र ठरेल आणि संस्था प्रगतीपथावर जाईल, असे प्रतिपादन काकती येथील मार्कंडेय …

Read More »