Thursday , March 5 2026
Breaking News

Belgaum Varta

शालेय वेळेत अवजड वाहनाची वाहतूक थांबवा : युवा समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : शहरात अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा मुद्धा गंभीर झाला असून शहरात अवजड वाहनांना शालेय वेळेत अवजड वाहनाची वाहतूक थांबवावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगावच्या पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. ऑगस्ट २०२२ मध्ये कॅम्प येथे अवजड वाहनाच्या धडकेत एका मुलाचा मृत्यू झालेल्या दुःखद घटनेनंतर, पोलीस प्रशासन …

Read More »

के-सेट परीक्षेतून मराठी विषय न वगळण्यासाठी युवा समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : कर्नाटक राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा-२०२५ (के-एसईटी-२०२५) कर्नाटक परीक्षा प्राधिकारणाद्वारे ०२.११.२०२५ रोजी आयोजित करण्यात आली असून २८ ऑगस्ट पासून उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यंदा सदर परीक्षांसाठी बेळगाव केंद्र देण्यात आले आहे. मात्र परीक्षेतून मराठी विषय वगळण्यात आला आहे. यावर्षी यामध्ये वाणिज्यशास्त्र, कन्नड, अर्थशास्त्र, इंग्रजी, राज्यशास्त्र, …

Read More »

बिम्समध्ये धक्कादायक प्रकार; चक्क रुग्णाचे आतडेच कापले!

  बेळगाव :  बिम्स रुग्णालयाने आणखी एक मोठी चूक समोर आली आहे. ऑपरेशन दरम्यान पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाचे आतडे कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रातील एक गंभीर चूक समोर आली आहे. पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या एका तरुणाचे आतडे शस्त्रक्रिये दरम्यान कापल्याची घटना घडली आहे. महेश मादार नावाच्या …

Read More »

जायंट्स ग्रुप मेनतर्फे गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा

  बेळगाव : जायंट्स ग्रुप बेलगाम मेन च्या वतीने यंदाही बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर विभागासाठी श्री मूर्ती देखावा व उत्कृष्ट श्री मूर्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंडळानी 30 ऑगस्टपर्यंत खालील ठिकाणी नांवे नोंदवावीत. 1) विजय अचमनी, अचमनी हार्डवेअर गणपत गल्ली. फोन:9448147909 2) फॅशन कॉर्नर, टिळकवाडी, फोन – 9590480505 …

Read More »

चन्नेवाडीतील ऐतिहासिक वटवृक्ष कोसळला

  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील कलमेश्वर मंदिर परिसरातील चारशे ते पाचशे वर्ष जुना वटवृक्ष पाऊस वाऱ्यामुळे अखेर मुळासकट कोसळला. गावातील जाणकारांच्या मतानुसार हा वटवृक्ष जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचा कलमेश्वर मंदिर जवळ असून, या महाकाय वटवृक्षाबरोबर अनेकांच्या आठवणी जोडलेल्या होत्या. अनेक पारंब्या त्या वटवृक्षाला असल्याने त्या पारंब्याना झोकाळत अनेक …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटींच्या साहित्याने बेळगावसह उपनगरातील बाजारपेठा फुलल्या!

  बेळगाव : लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आले असून गणेश चतुर्थीच्या सणासाठी सजावटींच्या साहित्याने बेळगावसह उपनगरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजारात सजावटींच्या साहित्यात विविध आकर्षक मखर प्लास्टिक फुलांच्या माळा, मोत्यांचे तसेच विविध प्रकारचे हार, पाट, फुलांच्या माळा, पडदे, झालर, आकर्षक तोरणे यांची बाजारपेठेत रेलचेल झाली आहे. त्याचप्रमाणे पूजेचे साहित्य …

Read More »

काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांना २८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

  बंगळूर : बेकायदेशीर बेटिंग कंपनी चालवण्याच्या आरोपांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेले काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना येथील न्यायालयाने रविवारी २८ ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत पाठवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदाराला आज सकाळी सिक्कीमहून बंगळुरला आणण्यात आले. येथील विमानतळावर पोहोचताच ईडीच्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेतले. …

Read More »

चिन्नय्या यांच्या अटकेनंतर धर्मस्थळ प्रकरणाला नवे वळण; कवटीचे रहस्य उलगडले

  बंगळूर : चिन्नय्या यांनी आणलेला मृतदेह कुठून आला या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) चिन्नय्या यांची चौकशी करण्यासाठी त्याला १० दिवस कोठडीत घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामागील स्फोटक गुपिते उलगडत आहेत. चिन्नय्या यांनी आणलेला मृतदेह धर्मस्थळापूर्वी दिल्लीला गेल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर सुवर्ण महोत्सवी वर्ष

  बेळगाव : बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एक भव्य परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगाव सीमाभागात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्सासात आणि उत्साहात साजरा केला जातो. बेळगावच्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेण्याचे काम एका विशिष्ट पूर्ण रीतीने बेळगाव उपनगरातील बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे. यावर्षी …

Read More »

मराठा बँकेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

  बेळगाव : मराठा बँकेची 83 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंदिर येथे कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रारंभी बँकेचे चेअरमन श्री. बाळाराम पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले व प्रास्ताविक भाषणात स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या बँकेने केलेल्या प्रगतीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. तसेच 2024-2025 च्या …

Read More »