Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात आणखी एक अमानुष घटना : अंगावरील कपडे काढून महिलेला मारहाण

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण झाल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती अशीच घटना बेळगाव शहरातील वडरवाडी येथे घडली. बेळगाव येथील वडरवाडी येथे वेश्याव्यवसायाच्या आरोपावरून महिला व तिच्या मुलीला शेजाऱ्यांनी मारहाण करून त्यांचे कपडे फाडले. वडरवाडी येथे आई आणि मुलगी एकाच घरात राहतात. …

Read More »

राजस्थान येथील अपघातात हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघे ठार

  पती, पत्नी, मुलगा, मुलीचा समावेश हुपरी : येथील संभाजी मानेनगरमधील एकाच कुटुंबातील चारजणांचा राजस्थामधील पाली येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. यामध्ये बाबुराव चव्हाण (वय 50), त्यांच्या पत्नी सौ. सारिका चव्हाण (38), मुलगी साक्षी (19) आणि मुलगा संस्कार (17) या चौघांचा मृत्यू झाला, तर पट्टणकोडोली येथील प्रमोद पुरंदर वळिवडे …

Read More »

झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

  झांशी : उत्तर प्रदेश मधील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी सकाळी नवजात शिशु विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. तर १६ बालकं गंभीर जखमी झाले आहेत. ३७ बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याचे समोर …

Read More »

भाजपच्या असंतुष्ट नेत्यांची बंगळूरात पुन्हा बैठक

  विजयेंद्र यांचा चतुराईने पलटवार बंगळूर : बसनगौडा पाटील यत्नाळ आणि असंतुष्ट छावणीतील प्रमुख नेत्यांची १५ नोव्हेंबर रोजी माजी आमदार कुमार बंगारप्पा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. वक्फच्या प्रश्नाबाबत जनजागृती करणे हा या बैठकीचा उद्देश होता. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष किंवा हायकमांडला त्यांनी याबाबत विश्वासत घेतले नव्हते. बैठकीनंतर यत्नाळ म्हणाले, “वक्फबाबत आम्ही …

Read More »

९८ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी सवलतीत रेल्वे देण्यास रेल्वे मंत्रालयाचा नकार

  नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होत आहे. मात्र मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली सवलतीच्या दरात विशेष रेल्वे देण्यास रेल्वेमंत्र्यांच्या कार्यालयाने नकार दिल्याचे आज संयोजकांना कळविण्यात आले. तशी माहिती सरहदचे संजय नहार यांनी दिली. आता महाराष्ट्र राज्याच्या …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या रोहित आर. पाटील यांना शुभेच्छा

  बेळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024, तासगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गटाचे) अधिकृत उमेदवार मा. स्व. आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव सीमावासीयांच्या निकट असणारे रोहित आर. आर. पाटील यांची आज तासगाव येथे असणाऱ्या जाहीर सभेमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रतिनिधी आणि येळ्ळूर विभाग …

Read More »

नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात रविवारी कार्तिक उत्सव आणि महाप्रसाद

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये कार्तिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या कार्तिकोत्सवाचे यंदाचे 65 वे वर्ष असून रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कार्तिक उत्सव पार पडणार आहे. त्यानिमित्त सकाळी 8 वाजता होम हवन, 9 वाजता लघुरुद्राभिषेक, 11 वाजता सत्यनारायण पूजा, …

Read More »

राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर

  बेळगाव ‌: पत्रकारिता, शिक्षण, समाजसुधारणा या क्षेत्रात भरीव कार्य केलेले राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ नेते, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, घोंगडी व पुष्पहार …

Read More »

बी के मॉडेल हायस्कूलमध्ये प्रथम विषय मराठी विषयाची कार्यशाळा संपन्न

  बेळगाव : बी के मॉडेल हायस्कूलमध्ये प्रथम विषय मराठी विषयाची कार्यशाळा संपन्न. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. जोशी, प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहर क्षेत्र शिक्षणाधिकारी माननीय श्री. रवी बजंत्री, एस. एस. एल. सी. नोडल अधिकारी श्री. रिजवान नावगेकर, मराठी फोरम अध्यक्ष श्री. संजय नरेवाडकर, एस. टी. एफ …

Read More »

रेणूका चिरमुरकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार बहाल

  खानापूर : बेळगाव येथील राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळयात बेळगाव विभागातुन यळ्ळेबैल (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या शिक्षिका सौ. रेणूका नारायण चिरमुरकर यांची निवड झाली. त्यानिमित्त इंन्टीग्रेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव, नॅशनल रूरल डेव्हलमेंट फाऊंडेशन बेळगाव यांच्या कर्नाटक महाराष्ट्र, गोवा, गुजरात व दिल्ली राज्यातुन राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण केले जाते. …

Read More »