निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी, पदाधिकाऱ्यांनी मुंबई मुक्कामी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन बेळगाव सीमा भागातील तरुणांच्या बेरोजगारी संदर्भात व्यथा मांडल्या. त्याचबरोबर बेळगाव सीमाभागात रोजगार मेळावा आयोजित करून बेळगाव सीमाभागातील तरुणांना महाराष्ट्र सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. त्यावेळी उदय सामंत यांनी बेळगाव सीमा भागातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा घेण्याचे आश्वासन दिले आहे.
उदय सामंत यांच्यासमोर सादर करण्यात आलेल्या निवेदनात, महाराष्ट्र कर्नाटक सीमा खटला 2004 पासून प्रलंबित असल्याने येथील तरुण वर्ग बेरोजगारात होरळतोय. सीमा भागातील बेरोजगार आणि पिचलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम महाराष्ट्र एकीकरण युवा समिती संघटनेने दोन वर्षांपूर्वी केले होते महाराष्ट्र शासनाकडून १७०० तरुण वर्गाला रोजगाराची संधी देण्याचे यश संघटनेला मिळाले तसेच महाराष्ट्र सरकार आपल्या सीमाभागातील अविरत काम करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते, काही कारणास्तव मागील काही अपर्याय कारणामुळे रोजगार मेळावा होऊ शकला नाही याची खंत होती.. पण या वर्षी रोजगार महामेळावा घेण्यासाठी अवितर काम करीत, नेतांचा मागोवा घेत पुन्हा हालचाली सुरू केल्या…
मान खासदार धर्याशिल माने, कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनाही प्रस्ताव अगोदरच कानी घातला होता त्यांनीही सहमती दर्शवली होती. याचे निवेदनाद्वारे आठवण करून देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर काल मंगळवार दिनांक ४/२/२०२५ रोजी संघटनेमार्फत मुबई दौरा करून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सावंत साहेबांशी भेट घेतली. निपाणी सीमाभागातील रोजगार मेळावा घेण्या करिता निवेदन देण्यात आले. अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांनी मागील रोजगार मेळाव्यात दरवर्षी सीमाभागात तरुण वर्गासाठी रोजगार मेळावा घेण्याचे अभिवचन दिले होते ते पाळावे यासाठी विनंती केली.
निवेदनाचा स्वीकार आणि पदाधिकाऱ्यांचे मनोगत ऐकून उदय सावंत यांनी, यावर लवकरच हालचाली करू.या मागणी संदर्भात पुढची बैठक ठरविण्यात येईल.त्याची माहिती तुम्हाला लवकर कळविण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी विभाग अध्यक्ष जयराम मिरजकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील साहेब, कपिल बेलवळे, अमर विटे उपस्थित होते.