बेळगाव : आर्ट्स सर्कलचा दिवाळी पहाट कार्यक्रम मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी रामनाथ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. गायिका होत्या विदुषी अपूर्वा गोखले. पहाटे ठीक ६ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम खूप रंगला आणि श्रोत्यांची उत्स्फूर्त अशी दाद कलाकारांना मिळाली. सुरुवातीला मेधा मराठे ह्यांनी सर्वांचे स्वागत केले. अपूर्वा गोखले …
Read More »काळ्या दिनासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जांबोटी विभागात जनजागृती
खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा …
Read More »जुनी हुबळी दंगल प्रकरणी खटला मागे घेऊ नये : नागरिक हितरक्षण समितीची मागणी
बेळगाव : जुनी हुबळी येथील पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविणे, वक्फच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या राज्य सरकारच्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आज बेळगावात नागरिक हितरक्षण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिक हितरक्षण समितीच्या वतीने जुनी हुबळी दंगल प्रकरणी सरकारने मागे घेतलेला खटला आणि …
Read More »तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये किमतीचे १० टन गोमांस पकडले. जागरूक नागरिकांच्या मदतीने ही कारवाई चंदगड पोलिसांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी केली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक आकाश राजू भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घटनेतील संशयित आरोपी सय्यद इस्माईल सय्यद अल्लाउद्दीन मिरचोणी, (वय ४८, …
Read More »बेळगाव महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी महत्वाची चर्चा
बेळगाव : बेळगाव महापालिकेची आज सर्वसाधारण सभा झाली. महापालिकेला येणे असलेली थकबाकी, भाडेपट्टी व महसूल वाढीबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. बेळगाव महापालिकेत आज महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. बेळगाव महानगरपालिकेच्या सभेच्या सुरुवातीला नुकतेच निधन झालेल्या नगरसेविका जरीना फतेखान यांचे पती खतल अहमद फतेखान …
Read More »जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठे यश, ३ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आले आहे. ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. अखनूर परिसरात सुरक्षा यंत्रणांनी ही मोठी कारवाई केली आहे. अखनूर भागात दहशतवाद्यांनी जवानांच्या रूग्णवाहीकेवर गोळीबार केला होता. त्यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशन करत ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये …
Read More »भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनजागृती करावी : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी, कायदेशीर जागरूकता आणि जागृती आवश्यक आहे. भ्रष्टाचाराविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी न्याय आणि दोषींना शिक्षा होण्यास विलंब होत आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, पोलीस विभाग आणि कर्नाटक लोकायुक्त बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी …
Read More »राजस्थानात बसचा भीषण अपघात; १२ प्रवाशांचा मृत्यू
सीकर : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. यात १२ जणांचा मृत्यू झाला तर २० जखमी झालेत. लक्ष्मण गड परिसरात लक्ष्मण गड कल्व्हर्टवर प्रवाशांनी भरलेली खासगी बसचा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस अनियंत्रित झाली आणि पुलाच्या कठड्याला धडकली. यात बसचं मोठं नुकसान झालं. चालकाच्या बाजूचे …
Read More »मराठी भाषिकांनी आकाश कंदील आणि विद्युत रोषणाई बंद ठेवून निषेध नोंदवावा
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत आवाहन बेळगाव : आज मंगळवार दि. 29/10/2024 रोजी म. ए. युवा समितीची व्यापक बैठक युवा समिती कार्यालय, टिळकवाडी येथे आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी युवा समिती अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर हे होते. 1956 पासून बेळगावसह 856 गावे महाराष्ट्रापासून तोडून तत्कालीन केंद्र सरकारने तत्कालीन म्हैसूर …
Read More »हलशीवाडी (ता. खानापूर) येथे शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
खानापूर : हलशीवाडी (ता. खानापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता.२) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले जाणार असून दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ९ वाजता कारलगा येथिल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta