उपमुख्यमंत्री शिवकुमार; भूसंपादन प्रक्रिया सुरू बंगळूर : “आम्ही अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याची अधिसूचना जारी करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणत आहोत. यासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे,” असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले. विजापूर जिल्ह्यातील कोल्हारा येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी …
Read More »नॅशनल हेराल्डला देणगी दिल्याचा ‘डीके ब्रदर्स’वर आरोप; ईडीच्या आरोपपत्रात उल्लेख
बंगळूर : नॅशनल हेराल्ड प्रकरण आता डीके ब्रदर्सपर्यंत येऊन पोहोचले आहे. यंग इंडियासाठी डी. के. शिवकुमार आणि त्यांचे बंधू डी. के. सुरेश यांनी २.५ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले. नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने न्यायालयात अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले आहे. अतिरिक्त चार्जशीटमध्ये डीके ब्रदर्स हे …
Read More »सहकार चळवळीच्या वाढीसाठी पूर्ण सहकार्य : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही कोल्हापूर : राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सहकार क्षेत्रातही काळानुसार बदल करणे आवश्यक असून सहकार चळवळ टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक सहकार्य करु, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील विश्वनाथराव …
Read More »इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
713 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. त्यांच्याहस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील …
Read More »अल्पवयीन सामूहिक अत्याचार प्रकरणी रिसॉर्ट संचालकांसह तिघे ताब्यात
बेळगाव : टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या पाच झाली आहे. अलीकडेच अटक करण्यात आलेल्यांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सीपीआयचा अल्पवयीन मुलगा आणि ज्या रिसॉर्टमध्ये गुन्हा घडला होता तो चालवणारे रोहन पाटील …
Read More »वैष्णवी हगवणेप्रकरणी सासरा अन् दिराला अटक
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. राजेंद्र हगवणे आणि …
Read More »विजेच्या धक्क्याने शिक्षकाचा मृत्यू; अथणी येथील घटना
बेळगाव : आपल्या लग्नाचा साजरा करून घरी परतलेल्या शिक्षकाला घरासमोरील गेट उघडणे जीवावर बेतले. गेटला विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अथणी शहराच्या सत्य प्रमोद नगर येथे घडली आहे. प्रवीणकुमार कडापट्टिमठ (वय ४१) असे या दुर्दैवी शिक्षकाचे नाव आहे. प्रवीणकुमार कडापट्टिमठ हे मूळचे तेरदाळ गावचे रहिवासी होते. …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक शनिवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किनेकर यांनी केले आहे.
Read More »बेळगावमध्ये ऑटो मीटर सक्तीचे करण्यात येणार; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : बेळगावमध्ये पुढील तीन महिन्यांत ऑटो मीटर सक्तीचे केले जाईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. आज पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, ऑटो मीटर सक्तीचे करण्यासाठी त्यांनी आणि प्रादेशिक परिवहन आयुक्तांनी अनेकदा बैठका घेतल्या असून, ऑटो चालक …
Read More »मुतगा कृषी पत्तीन सहकारी संघाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी; भागधारकांची मागणी
बेळगाव : मुतगा (ता. जि बेळगाव) येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ लिमिटेड या संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि या संस्थेकडून गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेले पीक कर्जाचे वाटप तात्काळ पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी संस्थेच्या भागधारक शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मुतगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta