Sunday , July 26 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा ‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार २०२५’ करिता मराठी विभागासाठी श्री. सुशांत यल्लाप्पा कुरंगी, प्रतिनिधी, दैनिक तरुण भारत बेळगाव व कन्नड विभागासाठी श्री. मंजुनाथ एच. पाटील, जिल्हा प्रतिनिधी, पावर टी.व्ही., बेळगाव यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच, ‘प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार २०२५’ करिता मराठी विभागासाठी सौ. अक्षता वामन नाईक, जिल्हा प्रतिनिधी, पुढारी न्यूज टी. व्ही., बेळगाव व कन्नड विभागासाठी सौ. विमला सी. चिनकेकर, चिक्कोडी प्रतिनिधी, दैनिक होसदिगंत यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सदरहू पत्रकार पुरस्कार रविवार दि. १८-०१-२०२६ रोजी सायंकाळी ५-३० वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, गोवावेस, बेळगाव येथे आयोजित केलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटन सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *