Monday , September 21 2026
Breaking News

देसूर येथे विकासकामांचे भूमिपूजन; अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Spread the love

 

बेळगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या हस्ते देसूर येथे रस्ते कॉक्रिटीकरण व विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्थानिक पातळीवरील अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत दशरथ बाबू पाटील, राजेंद्र जोतिबा पाटील, उत्तम गंगाराम पाटील, रेणुका बाळकृष्ण पाटील, शंकर करकी, रोहित तलवार, प्रशांत आरागू अशा अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. “बेळगाव ग्रामीणचा विकास हाच आमचा ध्यास असून, कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे पक्षाची ताकद अधिक वाढली आहे,” असे त्या म्हणाल्या. देसूर परिसरातील रस्ते आणि नागरी सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे उचगाव ब्लॉक युवा अध्यक्ष वेंकट पाटील यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *