Monday , June 1 2026
Breaking News

क्रीडांगण द्या हो… क्रीडांगण!

Spread the love

 

निपाणी तालुका ठिकाणी नाही सुसज्ज क्रीडांगण; गुदमरतोय खेळाडूंचा जीव

निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील बंगल्यांच्या वाढत्या संख्येमुळे खेळासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध होणे कठीण झाले आहे. जी मैदाने उपलब्ध आहेत त्यांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूसह विद्यार्थ्यांना मोबाइलवरील गेम खेळावे लागत आहेत. शहरात दरवर्षी वेगवेगळ्या निमित्ताने अनेक लहान मोठ्या विविध प्रकारच्या स्पर्धा भरत आहेत. पण सशाची क्रीडांगणे तयार करण्यासाठी कुणाकुणाचाही पुढाकार दिसत नाही. युवा पिढीला खेळासाठी मैदान मिळण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुलांसह युवकांना क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल असे मैदानी खेळ रस्त्यावरच खेळावे लागत आहेत. रस्त्यावर अपघात होतात म्हणून अनेक जणांना इच्छेला मुरड घालत आहेत.
आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे युवकांचा कल मैदानी खेळाकडे वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने, क्रिकेट, फुटबॉल तर इनडोअर गेम्समध्ये बॅडमिंटन आणि टेनिस खेळायची क्रेझ वाढली आहे. परंतु पुरेशी मैदाने नसल्याने त्यांच्या आवडीला वाव मिळेनासा झाला आहे. शहरात समर्थ मंडळ व्यायाम शाळा, म्युनिसिपल हायस्कूल आणि शहराबाहेर नांगनूर रस्त्यावर अशी तीनच मैदाने निपाणीतील खेळाडूसाठी आहेत. मैदानांची संख्या कमी झाल्याने मुलांचा मैदानात खेळण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. काही मैदाने शहरात आहेत त्याचा महापालिकेने विकास करावा. शहरात सर्वांसाठी खुला असलेल्या एकमेव म्युनिसिपल हायस्कूल मैदानाला उर्जित अवस्था मिळवून देण्याची मागणी शहरातील खेळाडूंमधून होत आहे.
—————————————————————-
इनडोअर स्टेडियम धुळकांकडून
येथील कित्तूर चन्नम्मा चौकास शेजारी अनेक वर्षांपूर्वी इंदोर स्टेडियम बांधण्यात आले आहे. सुरुवातीच्या काळात हॉलीबॉलचे सामने झाले. पण त्यानंतर तेथील खेळ संपुष्टात आले आहेत. त्यामुळे सध्या हे स्टेडियम धुळखात पडले आहे.
—————————————————————–
‘शहरातील खेळाडूंसाठी खेळण्यास एकही सुसज्ज असे क्रीडांगण नाही. त्यामुळे स्पर्धा भरविणे, सराव करणे कठीण होत आहे. यापूर्वी बऱ्याचदा नगरपालिका प्रशासनाकडे क्रीडांगणाची मागणी केली आहे. पण त्याची आजतागायत पूर्तता झालेली नाही.’
-सोमनाथ शिंदे, खेळाडू, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *