बेळगाव : गोव्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर, उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी पकडून ४० लाखांहून अधिक दारू जप्त केली आहे. गोव्याहून महाराष्ट्रात अवैधरित्या फिल्मीस्टाईलने वाहतूक करण्यात येत असलेल्या कंटेनरला पकडून तब्बल ४८ लाखांहून अधिक किमतीच्या दारूसह एकूण तब्बल ८४ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची …
Read More »बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक सभेत माजी आमदारांचा निषेध
२०२४-२०२९ सालाकरिता नव्या कार्यकारिणीची निवड बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. या सभेत पत्रकार संघास मिळालेला निधी अन्यत्र वळविल्याने माजी आमदार अनिल बेनके यांचा निषेध करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक होते. प्रारंभी संघाचे …
Read More »मराठा समाजातील युवकांनी उत्सवामध्ये गुंतू नये
मराठा समाज सुधारणा मंडळाची सभा संपन्न बेळगाव : मराठा समाजातील युवकांनी सण, उत्सवामध्ये गुंतून न जाता शिक्षण, नोकरी व उद्योगधंद्याकडे लक्ष द्यावे असे मत मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अनेकांनी व्यक्त केले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, खजिनदार के. एल. मजूकर, …
Read More »१७ महिन्याच्या बालकासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
चिक्कोडी : आईने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच रायबाग तालुक्यात घडली असताना १७ महिन्याच्या बालकासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील मांगनूर येथे आज घडली. गायत्री वाघमोरे (२६) हिने १७ महिन्याच्या कंदम्मा कुशलसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक …
Read More »सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांचा १४ भूखंड परत करण्याचा निर्णय
बेंगळुरू : कर्नाटकातील बहुचर्चित म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीमधील घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या वादात अडकले आहेत. आता सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीला पत्र लिहिले असून त्यांना वाटप केलेले १४ भूखंड परत करणार असल्याचे सांगितले आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, माझ्याविरोधात सुरू असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला …
Read More »चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थानाचा अभिषेक
बेळगाव : चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग देवस्थानाच्या नुतन मुखवट्याचा अभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुर्वीचे मुखवटे जुने व अकाराने लहान आणि जीर्ण झाले असल्याने नविन मुखवट्याचा साज चढविण्याचा निर्णय कमिटीने घेतला. या नुतन मुखवटाच्या खरेदीसाठी भाविकांनी अर्थिक देगणी दिल्याने नुतन मुखवटाचा साज चढवला जाणार आहे. अभिषेक सोहळा घटस्थापना तसेच …
Read More »थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग; २५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू
नवी दिल्ली : थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीत २५ विद्यार्थी आणि शिक्षकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेने थायलंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मंगळवारी शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक बसने सहलीला निघाले होते. याच …
Read More »बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन
बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना “महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार” कोल्हापूरचे माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. महात्मा गांधी विचार मंच गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी …
Read More »संजीवीनी फौंडेशनच्या “उमंग २०२४”चे आज आयोजन
युवा व्याख्याते युवराज पाटील यांचे व्याख्यान बेळगाव : येथील संजीवीनी फौंडेशनच्यावतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘उमंग २०२४’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्त मंगळवारी (ता.१) सायंकाळी ४ वाजता लोकमान्य रंग मंदिरात येथे युवा व्याख्याते युवराज पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. संजीवीनी फौंडेशनने साठ वर्षांवरील नागरिकांसाठी गायन आणि नृत्य स्पर्धा आयोजित …
Read More »हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ; नवविवाहितेची आत्महत्या
खानापूर : हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून खानापूर तालुक्यातील नंदगड येथील एका नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अर्शअहमदी मुदस्सर बसरीकट्टी (19) रा. काझी गल्ली असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती मुदस्सर रियाजअहमद बसरीकट्टी (32) यास अटक करण्यात आली आहे. याबाबत समजलेली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta