Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या कुस्तीपटूचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश

  बेळगाव : गोवा येथे राष्ट्रीय खेळ प्राधिकरण टीएएफ् आयएकेएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत येळ्ळूरच्या मराठी मॉडेल शाळेची कुस्तीपटूने घवघवीत यश संपादन केले. म्हापसा येथील पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गोवा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत बेळगाव, गोवा, केरळ, आंध्रप्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात कुमारी आराध्या भरमाण्णा …

Read More »

बेळगावकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : खास. जगदीश शेट्टर

  बेळगाव : बेळगावच्या जनतेचे प्रेम आणि विश्वास आपण कधीच विसरणार नाही, जगदीश शेट्टर यांची शक्ती काय आहे हे बेळगावकरांनी राज्याला दाखवून दिले आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील विकासकामाला लवकरच सुरुवात करणार आहे, अशी प्रतिक्रिया बेळगावचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली. आज बेळगावमध्ये आल्यानंतर आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत …

Read More »

सांबरा विमानतळाच्या विकासकामांबाबत खा. जगदीश शेट्टर यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

  बेळगाव : बेळगावचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव येथील सांबरा विमानतळाला भेट देऊन विमानतळाच्या विकासकामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बेळगाव एव्हिएशन ॲथॉरिटीच्या विकासाबाबत राज्य व केंद्र सरकारकडून प्रलंबित विकास कामांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 322 कोटी रुपयांच्या अनुदानातून बांधण्यात येत असलेल्या डोमेस्टिक टर्मिनल – टी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बालबोधिनी अंकलिपी प्रकाशन सोहळा व शैक्षणिक उपक्रम शुभारंभ

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बालबोधिनी अंकलिपी प्रकाशन सोहळा व शैक्षणिक उपक्रम शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम गुरुवार दिनांक १३ जून २०२४ रोजी कावळे संकुल टिळकवाडी, येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस श्री. मालोजीराव अष्टेकर, रविकिरण प्रकाशनचे प्रशांत इनामदार, नगरसेवक शिवाजी …

Read More »

डिजिटल न्यूज असो. तर्फे खा. जगदीश शेट्टर यांचा सत्कार

  बेळगाव : बेळगावचे नूतन खा. जगदीश शेट्टर यांचा डिजिटल न्यूज असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. खा. शेट्टर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच यावेळी बोलताना बेळगावातील समस्यांच्या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत. अनेक समस्या निवारणासाठी आपले प्रयत्न राहतील अशी ग्वाही दिली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी रतन गवंडी, इकबाल जकाती, उपेंद्र बाजीकर, …

Read More »

बेळगावचे चार युवक बेळगाव ते लेह लडाख दुचाकीवरून रवाना

  बेळगाव : शहरातील युवक सुशांत संजय सांगूकर (गोंधळी गल्ली), मृणाल मधुकर काकतकर (हिंडलगा), कौशिक शिवाजी भातकांडे व प्रियेश किरण लोहार (दोघे भातकांडे गल्ली) हे चौघेजण बेळगाव ते लेह लडाख प्रवासासाठी दुचाकीवरून बुधवार दिं.12 रोजी सकाळी रवाना झाले. चार युवकांची ही तुकडी बेळगाव ते दिल्ली, दिल्ली ते लेह लडाख व …

Read More »

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला नवा अल्टीमेटम

  शंभूराजे देसाईंची शिष्टाई फळाला जालना : मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगें पाटील यांनी ७ दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं. उपोषण सोडताना त्यांनी सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. १३ जुलैपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि सरकारने शब्द पाळला नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला …

Read More »

चन्नेवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन

  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील ग्रामस्थांनी क.नंदगड ग्रामपंचायतीचे विकासाधिकारी श्री. भीमाशंकर यांचेकडे अध्यक्ष, ग्रामविकासाधिकारी यांच्या नावे दोन मागण्यांची दोन निवेदने सादर केली. पहिल्या निवेदनात गेली काही वर्षे बंद असलेली प्राथमिक शाळा गावकऱ्यांच्या प्रयत्नातून १ जून पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शाळा व अंगणवाडी एकाच खोलीत भरविली जात …

Read More »

पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

  इटानगर : पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. तर चौना मीन यांनी शपथविधी सोहळ्यात अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याशिवाय बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू, वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना, मामा न्तुंग, दसांगलू पुल, …

Read More »

विश्वभारत सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  बेळगाव : विश्वभारत सेवा समिती बेळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शारदा प्रमोद चिमडे या होत्या. तसेच संस्थेचे सचिव प्रकाश नंदीहळी, श्री. निगोंजी पार्लेकर आणि श्री. पूण्णाप्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सभा पार पाडली. या वार्षिक सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी केले. …

Read More »