Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

अशोक नगरातील गटारीचे बांधकाम चुकीचे : माजी सभापती विश्वास पाटील यांचा आरोप

  निपाणी (वार्ता) : अशोकनगर ते पांडु मेस्त्री यांच्या दुचाकी गॅरेज पर्यंत यापूर्वी चुकीच्या पद्धतीने गटारीचे बांधकाम झाले होते. त्यामुळे बरीच वर्षे या परिसरातील नागरिकांंना पावसाळ्यात बराच त्रास सहन करावा लागला. आता याच भागात नगरपालिकेतर्फे जुनी गटार काढून नवीन गटार बांधली जात आहे. पण सध्या पूर्वीप्रमाणे गटारीचे बांधकाम सुरू आहे. …

Read More »

बेळगाव शहरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून

  बेळगाव : बेळगाव शहरात प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून केल्याची घटना महांतेश नगर पुलाजवळ घडली. बेळगाव शहरातील गांधी नगर येथील इब्राहिम गौस (२२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. इब्राहिमचे गांधी नगर येथील एका तरुणीवर प्रेम होते, आज तरुणीसोबत दुचाकी चालवणाऱ्या इब्राहिमला पाहून तरुणीच्या भावानेच त्याची हत्या केली. …

Read More »

…तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी कुणाला अटक करू शकत नाही! सुप्रीम कोर्टाचे आदेश

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पीएमएलए अंतर्गत अटक झाली होती. त्यानंतर देशभरात ईडीला दिल्या गेलेल्या अधिकारांवर चर्चा होत होती. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए अंतर्गत अटक करण्याच्या ईडीच्या अधिकारांवर महत्त्वाचा निकाल दिला आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि त्यांचे अधिकारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 19 अंतर्गत आरोपीला …

Read More »

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

  कोल्हापूर : आंध्र प्रदेश माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला भेट दिली. अंबाबाईच्या चरणी लीन होत त्यांनी सपत्नीक पंधरा मिनिटे पूजा केली. यावेळी नायडू दाम्पत्याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माध्य़मांशी बोलताना माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, मोदी इज व्हेरी गूड. …

Read More »

बंगळुरूत ‘यलो अलर्ट’; संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

  बंगळुरू : एकीकडे लोकसभा निवडणुकांचा धुरळा आणि दुसरीकडे अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. उत्तर भारतात मे महिन्याच्या कडाकाच्या उन्हानं काहिली होत आहे. पण दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. भारतीय हवामान खात्याने गुरुवारी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, …

Read More »

राजस्थान रॉयल्सची पराभवाची मालिका सुरूच; पंजाबकडून पराभूत

  राजस्थान रॉयल्सला अखेरच्या टप्प्यातील खराब कामगिरीचा पुन्हा एकदा फटका बसला. पंजाब किंग्सने राजस्थानकडून विजय हिसकावून घेत ६ धावांनी पराभव केला. राजस्थानचा हा सलग चौथा पराभव ठरला आहे. सॅम करनची ६३ धावांची नाबाद खेळी पंजाबसाठी निर्णायक ठरली. तर जितेश शर्मा आणि आशुतोष शर्माने शानदार फटकेबाजीसह संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. …

Read More »

जोशी मळा खासबाग परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

  बेळगाव : बेळगाव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून बुधवारी रात्री जोशी मळा खासबाग परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. बेळगाव शहरात चोरट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. जनतेला जीव हातात घेऊन सायंकाळच्या सुमारास फिरावे लागत आहे अशी परिस्थिती …

Read More »

एस. आर. मोरे यांचा नागरी सत्कार सोहळा दिमाखात साजरा

  बिजगर्णी : कावळेवाडी गावाच्यावतीने बिजगर्णी गावचे सुपुत्र, बिजगर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. आर. मोरे यांचा नागरी सत्कार सोहळा समिती हायस्कूलच्या प्रांगणात दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी होते. तसेच व्यासपीठावर माजी प्राचार्य आनंद मेणसे, मालोजीराव अष्टेकर, गोपाळ गावडा, डी. एन. मिसाळे, मनोहर बेळगावकर, आप्पा जाधव, …

Read More »

हाजगोळी येथील चाळोबा तलावात बुडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू

चंदगड (प्रतिनिधी) : पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळीला गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि. १५ मे रोजी हाजगोळी चाळोबा तलाव परिसरात घडली असून वडील सुखरूप आहेत. याबाबत समजलेली अधिक महिती अशी की, सुळगा (ता. बेळगांव) येथील फिवोना सलोमन जमूला रा. आंबेडकर गल्ली, सुळगा (वय 11) …

Read More »

“त्या” बँकेत कर्जासाठी फोफावला “एजंट”राज

  आत्तापर्यंत आपण “त्या” बँकेच्या अंतर्गत व्यवहारातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार पाहिला. अध्यक्षाने संपूर्ण बँक कशी पोखरून ठेवली आणि कर्मचारी व इतर सहकाऱ्यांची पिळवणूक कशी केली हे “बेळगाव वार्ता”ने उजेडात आणले. पण अध्यक्षांचे प्रताप एवढ्यावरच थांबतील तर कसे? बँकेतील लोकांना धरून केलेला गैरव्यवहार कमी होता की काय पैसे कमविण्यासाठी या …

Read More »