बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी बेळगाव शहर, बेळगाव तालुका व खानापूर तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण …
Read More »लग्न मुहूर्तावर लागले तर थांबा अन्यथा बहिष्कार घाला; मध्यवर्तीच्या बैठकीत चर्चा
बेळगाव : दि. 24 रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समिती सदस्यांची 1 जून हुतात्मा दिन संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. बैठक सुरु होण्याआधी चर्चा रंगली ती मुहूर्तावर लग्न होत नसलेल्या विषयाची. दरम्यान उपस्थित सदस्यांनी समितीच्या बैठकीत चर्चा करून लग्न मुहूर्तावर लागले तरच थांबा अन्यथा लग्नावर बहिष्कार घालावे असे …
Read More »धामणे माध्यमिक विद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या कॉलम पूजा कार्यक्रम उत्साहात
धामणे : माध्यमिक विद्यालयाची शाळा सुधारण कमिटी व माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने शाळा इमारत बांधण्याचा संकल्प केला असून या कामाची सुरुवात दि. 23 रोजी अपरा भद्रकाली उप भाद्र नक्षत्र व प्रीती योग या शुभ मुहूर्तावर शाळा इमारत कॉलम पूजा श्री. रमाकांतदादा कोंडुसकर (अध्यक्ष, श्रीरामसेना हिंदुस्थान, बेळगाव) व श्री. …
Read More »भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी शुबमन गिल याची नियुक्ती
मुंबई : भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी युवा सलामीवीर शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. बीसीसीआय निवड …
Read More »मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव!
बेळगाव : मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने दहावी उत्तीर्ण झालेल्या मराठी माध्यमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहरातील गुणानुक्रमे पहिले दहा विद्यार्थी, बेळगाव ग्रामीण विभागातून गुणाानुक्रमे पहिले 10 विद्यार्थी आणि खानापूर तालुक्यातील गुणांनुक्रमे पहिले 10 विद्यार्थी अशा एकूण 30 …
Read More »नराधम बापाकडून तीन वर्षाच्या कोवळ्या मुलाचा खून; बैलहोंगल येथील घटना
बेळगाव : बेळगावमध्ये एक अमानुष कृत्य उघडकीस आले आहे. चुलीतील लाकडाने डोक्यात, हातावर आणि छातीवर मारल्याने एका तीन वर्षाच्या कोवळ्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील हारुगोप्पा गावात ही अमानुष घटना घडली. या मुलाची हत्या मद्यधुंद वडिलांनी आणि त्याच्या मित्रांनी केली. खून झालेल्या बालकाचे नाव …
Read More »बॉलिवूड अभिनेता मुकूल देवचे 54व्या वर्षी निधन!
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मुकुल देवचे निधन झाले आहे. २४ मे रोजी, वयाच्या ५४व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. मुकूलच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याने ‘आर… राजकुमार’, ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जय हो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुकुल देवचा जन्म १७ सप्टेंबर …
Read More »दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर (जिमाका): बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना(मौनीनगर) येथील इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन संपन्न झाले. यावेळी माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील, माजी आमदार बजरंगआण्णा देसाई, माजी आमदार संजयबाबा …
Read More »रायबाग येथील मठात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; स्वामीजी पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव : रायबाग येथील राम मंदिर मठाचे लोकेश्वर स्वामीजी यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे, तर त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेकळी गावातील मठाच्या स्वामीजींनी त्यांच्या मठात येणाऱ्या एका भक्ताच्या मुलीला अन्य जिल्ह्यात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर मुडलगी …
Read More »बेळगावात कोरोना रुग्ण: गर्भवती महिलेची चाचणी पॉझिटिव्ह
बेळगाव : कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. बेंगळुरूमध्ये ९ महिन्यांच्या बाळाला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर, कोविड आता बेळगावात पोहोचला आहे. बेळगावमधील एका गर्भवती महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका २७ वर्षीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta