बेळगाव : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन त्यांना यावर्षी मतदारसंघात आणलेल्या अनुदानाबाबत प्रश्न विचारले. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी विजय कोडगनूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. आपल्या माहितीप्रमाणे मतदारसंघाच्या संदर्भात एकही विकासकामे सुरू झालेली नाहीत, आमदार झाल्यानंतर …
Read More »बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा हरिद्वार गंगा महासभेच्यावतीने विशेष सन्मान
हरिद्वार : भारती श्रमजीवी पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव आणि बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा आज शनिवारी हरिद्वार येथे श्रीगंगा महासभा वतीने विशेष सन्मानित करण्यात आले. श्रीकांत काकतीकर सह पत्नी हरिद्वार येथे आले असता भारती श्रमजीवी पत्रकार संघ उत्तराखंड पत्रकार संघ, हरिद्वार प्रेस क्लब,तसेच गंगासभेच्या वतीने आज सायंकाळी गंगा आरती …
Read More »इंडिया आघाडीला चौथा धक्का; ‘आप’ पंजाब, चंदीगडमध्ये स्वतंत्र लढणार
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यानंतर आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील काँग्रेसवर नाराज झाले आहेत. केजरीवाल यांनी चंदीगड आणि पंजाब येथे लोकसभा निवडणुकीत कोणासोबत आघाडी करणार नसल्याची …
Read More »लोकसभा निवडणुकीपूर्वीच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार, गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी देशभर केली जाणार आहे, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. डिसेंबर २०१९ मध्ये संसदेने या कायद्याला मंजुरी दिली होती. “नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा असून याबाबत अधिसूचना काढली जाणार आहे. निवडणुकीपूर्वीच या कायद्याची अंमलबजावणी …
Read More »जायंट्स 6 फेडरेशनवर लाड, पाटील, हिरेमठ यांची निवड
बेळगाव : राज्यातंर्गत कार्यरत असलेल्या जायंट्स फेडरेशन 6 वर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे माजी अध्यक्ष अनंत लाड, शिवराज पाटील व शिवकुमार हिरेमठ यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी युनिट डायरेक्टरपद भुषविलेले अनंत लाड यांना पुन्हा युनिट एक च्या डायरेक्टरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी तीन वेळा फेडरेशन …
Read More »‘मतदारांना उत्तर द्या’ अभियानांतर्गत ग्रामीण भाजप मंडळचे मंत्री हेब्बाळकर यांना निवेदन
बेळगाव : कर्नाटक सरकारने जनतेला हमी योजनेचे आश्वासन दिले आणि सत्तेत आल्यानंतर ते राज्यात विकासकामे करत नाहीत, अर्थसंकल्पातील पैशाची चर्चा करून जनतेला आश्वासने द्यावीत पण काँग्रेस पक्षाने मोफत योजनेचे आश्वासन दिले आणि आज राज्य सरकार दिवाळखोर झाले आहे, असा आरोप भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला. भारतीय …
Read More »बेळगावात हरे राम.. हरे कृष्णाचा जागर!
उद्याही विविध कार्यक्रम बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या २६व्या श्री हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवास अभूतपूर्व जल्लोषात शनिवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्याशी भक्ती रसामृत स्वामी महाराज आणि चैतन्य सुंदर महाराज, मॉरिशस व वृंदावनदास महाराज यांच्या हस्ते रथाची …
Read More »शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार अनुदान मिळणार : अजित पवार
कोल्हापूर : वंचित शेतकऱ्याना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, अशी मागणी होती. 70 हजारांहून अधिक शेतकरी या योजनेपासून वंचित होते, त्यांना आम्ही मदत करण्याचे ठरविले आहे, लोकसभा निवडणुकीच्या आचासंहितेपूर्वी प्रोत्साहन अनुदान 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात केली. पाण्याचे दर कमी करावेत अशी शेतकऱ्याची …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी तर्फे 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिन मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी प्रबोधिनीचा हा रौप्य महोत्सवी मराठी भाषा दिन आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवर वक्त्यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर सीमाभागातील मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या …
Read More »‘महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला’, फडणवीसांनी श्वानाचा उल्लेख केल्यावरून उद्धव ठाकरेंची टीका
मुंबई : उद्धव ठाकरेंची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका “श्वान गाडीखाली मेलं तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटले. त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. तुम्ही अतिशय निर्ढावलेले, निर्घृण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात. फडणवीस यांच्यासाठी मी याआधी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta