नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यात पश्चिम …
Read More »बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन
नवी दिल्ली : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी (१३ मे) निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कर्करोगाने त्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे बिहारमध्ये शोककळा पसरली आहे. सुशील कुमार मोदी हे …
Read More »मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
मुंबई : मुंबईमध्ये आज दुपारी आलेल्या वादळानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अवघ्या मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपरमध्ये घडली. घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपवर महाकाय असे अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळून तब्बल 80 हून गाड्या …
Read More »बेनाडीत बिरदेव यात्रेनिमित्त भविष्यवाणीसह पालखी मिरवणूक; महाप्रसादाचे वाटप
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात रविवारी (ता.१२) करण्यात आली. यावेळी आयोजित भाकणुकीला बेनाडीसह परिसरातील भाविक उपस्थित होते. शनिवारी (ता.११) सायंकाळी माळावरील बिरदेव मंदिरात पालखी नेऊन आंबील भाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. रात्री आठ वाजता सिध्देश्वर देवालयात वालंग जमवून श्रींच्या पालखीची मिरवणूक …
Read More »कोगनोळीजवळ अपघात; एक ठार, एक जखमी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर टोलनाक्याजवळील मत्तिवडे फाट्यावर मोटरसायकल अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 13 रोजी सकाळी नऊ वाजता घडली. प्रताप बाळू पाटील (वय 27) राहणार पेंढाखळे तालुका शाहूवाडी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून प्रसाद नाईकवाडे हा युवक …
Read More »केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना आणखी एक दिलासा देत केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल …
Read More »आनंदनगर परिसरातील घरातून ड्रेनेजमिश्रित पाणी
बेळगाव : रविवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे आनंदनगर परिसर पाण्याखाली आला होता. मुसळधार पावसामुळे पाणी रस्त्यावर वाहत होते. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अनेकांची जीवनावश्यक वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आनंदनगर परिसरातील नाल्याचे काम अर्धवट स्थितीत सोडल्यामुळे नाल्यातून भरपूर प्रमाणात ड्रेनेजमिश्रित पाणी …
Read More »देशातील १३ विमानतळे बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ईमेल प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा तैनात!
नवी दिल्ली : देशात बनावट धमकीचं सत्र अद्यापही संपलेलं नाही. दिल्लीतील १०० शाळांना धमकीचे ईमेल प्राप्त झाल्यानंतर १२ मे रोजी १३ विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला रविवारी १३ विमानतळे उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. ईमेलनुसार तत्काळ शोध मोहिमही सुरू करण्यात आली. परंतु, …
Read More »चलवेनहट्टी येथे प्रवेशद्वारावर कमान बांधण्याच्या कामाला सुरुवात
बेळगाव : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चलवेनहट्टी येथील गावच्या प्रवेशद्वार कमान बांधण्याच्या कार्याचा शुभारंभ आजी-माजी सैनिक संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर काॅलम भरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुहासनी महिलांनी काॅलमची पुजा केली. यावेळी कार्यक्रमस्थळी भढजीच्या उपस्थितीत जोतिबा मारुती पाटील तसेच …
Read More »पांगीरे (ए) येथील तंबाखूला अक्षय तृतीये दिवशी १७१ रुपये प्रतिकिलो दर
निपाणी (वार्ता) : वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तंबाखूला अत्यल्प दर मिळत आहे. याशिवाय तंबाखूला बिनभरोशाचा दर मिळतो आहे. परिणामी तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जयसिंगपूर येथील तंबाखू व्यापारी सुभाषचंद्र नथामल रुणवाल यांचे बिचायतीदार शांतीलाल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta