Friday , September 13 2024
Breaking News

चलवेनहट्टी येथे प्रवेशद्वारावर‌ कमान बांधण्याच्या कामाला सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चलवेनहट्टी येथील गावच्या प्रवेशद्वार कमान बांधण्याच्या कार्याचा शुभारंभ आजी-माजी सैनिक संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर काॅलम भरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुहासनी महिलांनी काॅलमची पुजा केली. यावेळी कार्यक्रमस्थळी भढजीच्या उपस्थितीत जोतिबा मारुती पाटील तसेच त्यांच्या पत्नी उज्वला पाटील यांच्या वतीने पुजा करण्यात आली. त्यानंतर आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील तसेच सर्व पदाधिकारीच्या व ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते काॅलम भरणी करण्यात आली. या गावाच्या प्रवेशद्वारील‌ कमानीमुळे गावच्या सौंदर्यात भर पडणार आहे. चलवेनहट्टी येथे सैनिक संघटनेची स्थापना होऊन जेमतेम एक वर्ष पूर्ण झाले असताना कमान बांधणीचे कार्याला सुरुवात केल्याने गावकरी सैनिक संघटने बाबत समाधान व्यक्त करत आहेत.

यावेळी निगाप्पा हुंदरे, नारायण हुंदरे, अर्जुन बडवानाचे, मारुती बडवानाचे, संतराम आलगोंडी, मल्लाप्पा हुंदरे, निंगानी कुमाणा हुंदरे, राहुल पाटील, शिवराय आलगोंडी, जोतिबा बडवानाचे, गुरुनाथ पाटील, एस.डी.एम.सी तसेच कामगार संघटना अध्यक्ष मनोहर हुंदरे, मनोहर राजाई, दिपक हुंदरे, किरण पाटील, भरमा पाटील, परशराम आलगोंडी, भुषण पाटील, जोतिबा शिवाजी बडवानाचे, विनोद आलगोंडी, शोभा पाटील, कल्पना पाटील, जयश्री हुंदरे, आरती आलगोंडी, रेणुका हुंदरे, संजना पाटील आदी उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने रविवारी पुरस्कार वितरण सोहळा!

Spread the love  बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव या सोसायटीच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *