Sunday , September 8 2024
Breaking News

देशातील १३ विमानतळे बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ईमेल प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा तैनात!

Spread the love

 

नवी दिल्ली : देशात बनावट धमकीचं सत्र अद्यापही संपलेलं नाही. दिल्लीतील १०० शाळांना धमकीचे ईमेल प्राप्त झाल्यानंतर १२ मे रोजी १३ विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला रविवारी १३ विमानतळे उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. ईमेलनुसार तत्काळ शोध मोहिमही सुरू करण्यात आली. परंतु, तपासादरम्यान काहीही संशयास्पद आढळलं नाही. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

लखनौच्या चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, भोपाळ, पाटणा, जम्मू आणि जयपूर विमानतळांवर बॉम्बच्या भीतीने दहशत निर्माण झाली. तपासणीनंतर, बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीने धमकी ‘नॉन-स्पेसिफिक’ म्हणून घोषित केली.

“चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, लखनौ आणि इतर विमानतळांवर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी स्फोटक उपकरणांबाबत धमकीचा ई-मेल आला. सीसीएसएआय विमानतळाच्या सुरक्षा पथकाने संपूर्ण विमानतळाची कसून तपासणी केली. तपासणीनंतर बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीने ‘नॉन-स्पेसिफिक’ म्हणून जाहीर केले”, असं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने सांगितले. तपासणी आणि स्क्रिनिंग व्यतिरिक्त, लखनौ विमानतळ प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अतिरिक्त पावले उचलत आहे, असेही त्यात म्हटले आहे.

दिल्लीतील रुग्णालयातही धमकीचे मेल
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि १० हून अधिक रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. दिल्ली पोलिसांनी नंतर सांगितले की ही धमकी फसवी होती आणि ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

सिक्कीममध्ये सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळून ४ जवानांचा जागीच मृत्यू

Spread the love  नवी दिल्ली : सिक्कीमध्ये गुरुवारी भारतीय सैन्य दलाचे वाहन ७०० ते ८०० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *