बेळगाव : रविवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे आनंदनगर परिसर पाण्याखाली आला होता. मुसळधार पावसामुळे पाणी रस्त्यावर वाहत होते. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अनेकांची जीवनावश्यक वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आनंदनगर परिसरातील नाल्याचे काम अर्धवट स्थितीत सोडल्यामुळे नाल्यातून भरपूर प्रमाणात ड्रेनेजमिश्रित पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. वारंवार मागणी करून देखील स्थानिक लोकप्रतिनिधीनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. आनंदनगर परिसरातील या नाल्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आनंदनगरवासीयांनी दिला आहे.