नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (6 फेब्रुवारी) आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा हटवली जाईल आणि देशात जातनिहाय जनगणना होईल, अशी मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आरक्षणावर 50 …
Read More »माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या कारखान्यावर सीआयडी छापा
गोकाक : माजी मंत्री, गोकाकचे भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील चिक्कनंदी गावात एका कारखान्यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी कारखाना सुरू करण्यासाठी ॲपेक्स बँकेकडून ४३९ कोटींचे कर्ज घेतले होते. परंतु कर्जाची परतफेड न केल्याने …
Read More »खानापूरात बीई इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
खानापूर : लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व बीई इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मंथन अशोक वड्डीन्नावर (19) याने आपल्या रहात्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. 6 फेब्रुवारी दुपारी घडली आहे. याबाबत समजलेली माहिती लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व यडोगा ता. …
Read More »जिल्हा वाल्मिकी समाजातर्फे बेळगावात निदर्शने करून भव्य आंदोलन
बेळगाव : वाल्मिकी नायक समाजाला ‘बेरड’ हा पर्यायी शब्द अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करावा या मागणीसाठी बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. वाल्मिकी नायक समाजाला ‘बेरड’ हा पर्यायी शब्द अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करावा, समाजावरील अन्याय दूर करावा आदी मागण्यांसाठी बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाजाच्या …
Read More »फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 5 जणांचा मृत्यू
हरदा : मध्य प्रदेशातील हरदामध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जण होरपळल्याची प्राथमिक माहिती आहे. फटाक्यांच्या कारखान्यात एका मागोमाग एक अनेक स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या आहेत. धुराचा …
Read More »शंकरगौडा पाटील यांना भाजपने उमेदवारी द्यावी : विविध संघटनांची मागणी
बेळगाव : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ व अनुभवी नेते शंकरगौडा पाटील यांना तिकीट द्यावे, अशी मागणी विविध संघटनांच्या नेत्यांनी केली आहे. ज्येष्ठ व अनुभवी नेते शंकरगौडा पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी अनेक संघ-संस्थांनी केली आहे. बेळगावात आज मंगळवारी या संघ-संस्थांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन …
Read More »केजरीवालांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांचा पीएस वैभव आणि खासदार एनडी गुप्ता यांच्यासह अनेक आप नेत्यांच्या घरांवर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून आप नेत्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत असल्याची माहिती आहे. दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या …
Read More »मराठा सेवा संघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
वडगाव : १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त मराठा सेवा संघाची बैठक झाली आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा सेवा संघ, बेळगाव जिल्हा आयोजित बैठक रविवारी (ता. ४) मराठा सभागृह, गणेश कॉलनी, संभाजी नगर, वडगाव येथे झाली. यावेळी सोमवारी (ता. १९) सकाळी दहा वाजता शिवजयंती साजरी …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या माजी नगरसेविका व बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका सरला हेरेकर, प्राध्यापक अशोक अलगोंडी व एलआयसीचे डेव्हलपमेंट ऑफिसर अतुल देशमुख व अध्यक्षस्थानी परशराम गोरल …
Read More »मराठा बटालियनच्या सायकलस्वारांचे मध्यवर्ती शिवाजी चौकात स्वागत
निपाणी (वार्ता) : बेळगाव ते सिंहगड या ६०० किलोमीटर सायकल रॅलीने गडकोटला भेट देणाऱ्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या ११ सायकल स्वार जवानांचे निपाणीत मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि निपाणी भाग आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात आले. ४ फेब्रुवारीला झालेल्या मराठा दिनानिमित्त ११ लष्करी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta