Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव सीमाप्रश्न महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी विसरत चालली आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार

  मुंबई : ‘बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचाच असून बेळगाव सीमाभागा विना संयुक्त महाराष्ट्र अपुरा आहे पण महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी हा बेळगाव सीमाप्रश्न विसरत चालली आहे. या बेळगाव सीमासंदर्भात महाराष्ट्रातील साहित्यिकानी सदैव आपल्या प्रखर लेखणी द्वारे समाज जागृती करणे महत्वाचे असून महाराष्ट्रातील आजच्या तरुण पिढीला बेळगाव हा महाराष्ट्राचा भूभाग असून …

Read More »

निपाणीत २७, २८ रोजी टेबल टेनिस स्पर्धा

  नवीन शहा; आंतरराज्य खेळाडूंचा समावेश निपाणी (वार्ता) : निपाणी टेबल टेनिस असोसिएशनतर्फे येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर २७ व २८ रोजी भव्य खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख ८० हजारहून अधिक …

Read More »

बोरगाव येथील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाज हितासाठी सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असणा-या बोरगाव येथील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरास उत्सुकूर्त प्रतिसाद मिळाला. बोरगाव व परिसरातील नागरिकांसाठी साई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या वतीने हृदयविकार, मूत्रविकार, मुतखडा, हाडाची लक्षणे , मोफत उपचार, मोफत ईसीजी व मोफत रक्तातील साखर …

Read More »

मराठी भाषेचे राजवैभव जपणे गरजेचे

  प्रा. विष्णू पाटील; कागल न्यायालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निपाणी (वार्ता) : भाषा हे संवाद आणि अभिव्यक्तीचे साधन आहे. राज्याला वैभवशाली संस्कृतीचा वारसा लाभला आहे. समाजात संस्कृती टिकण्यासाठी भाषेची जपणूक करणे महत्त्वाचे आहे. असे मत प्रा. विष्णू पाटील यांनी व्यक्त केले. कागल येथील न्यायालयात आयोजित मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमात …

Read More »

राज्यातील २१ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

  बंगळूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात कर्नाटकातील २१ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. उद्या (शुक्रवारी) ७५ वा प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडणार असून पदक प्रदान करण्यात येणार आहे. एडीजीपी सौमेंद्र मुखर्जी आणि डीवायएसपी सुधीर महादेव हेगडे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती …

Read More »

आयसीएआय बेळगाव शाखेतर्फे विशेष कार्यक्रम

  बेळगाव : बेळगाव येथे, भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्सच्या बेळगाव शाखेने आयसीएआय भवन येथे स्टार्ट-अप संवाद आणि एमएसएमई सहयोग यशस्वीरित्या आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे श्री. दिलीप चांडक यांनी समारंभाचे उद्घाटन केले आणि त्यांच्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी व्यवसायिक संस्था आणि स्टार्ट अप्सच्या यशोगाथेत चार्टर्ड अकाउंटंट्सच्या महत्त्वाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. श्री. दिलीप …

Read More »

विराट कोहली ठरला ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’

  मुंबई : भारतीय फलंदाज विराट कोहली ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ बनला आहे. विराटने 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली होती. विराट कोहलीने चौथ्यांदा हा किताब पटकावलाय. 2012, 2017 आणि 2018 मध्येही विराट ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर’ बनला होता. विराट कोहलीने दिमाखदार कामिगिरीची मालिका सुरुच …

Read More »

१६ फेब्रुवारीचा अर्थसंकल्प पुढे ढकला

  भाजपचे राज्यपालाना निवेदन; पोटनिवडणुक व अर्थसंकल्प एकाच दिवशी बंगळूर : राज्यात काँग्रेस सरकार आल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री सिद्धरामय्या १६ फेब्रुवारी रोजी २०२४-२५ या वर्षाचा पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर करत आहेत. मात्र, त्याच दिवशी बंगळुर शिक्षक मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. मात्र, हे लोकप्रतिनिधी कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगून भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल थावरचंद गेहलोत …

Read More »

अपघातातील जखमी विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

  बेळगाव : महिन्याभरापूर्वी ब्रम्हनगर क्रॉस जवळ दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सौ. दिव्या सुजय पाटील (वय २४) रा. महावीर नगर उद्यमबाग यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. १ जानेवारी रोजी ब्रम्हनगर क्रॉस जवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचाराचा उपयोग …

Read More »

ईव्हीएम हटाओसाठी निपाणीत मोर्चा

  तहसीलदारांना निवेदन; नेते मंडळींचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मूलभूत अधिकार प्रदान केला आहे. त्या अधिकाराचा वापर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी केला पाहिजे. त्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणे आवश्यक आहे. सध्या ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केले जाते. परंतु इलेक्ट्रॉनिक मशीनबाबत शंका उपस्थित होते. यासाठी निवडणूक आयोगाने …

Read More »