निपाणी (वार्ता) : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांची नुकसान झाल्याची घटना बोरगाव घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झालेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटकातून हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यास नेणाऱ्या ट्रॅक्टर (क्र. के २८ टी. ए. ५१६९) बोरगाव जवळ आले असता …
Read More »येळ्ळूरवासियांचा सौंदत्ती डोंगरावर सामूहिक पडल्यांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
येळ्ळूर : गेल्या चार दिवसापासून येळ्ळूरचे भाविक शांकभरी पौर्णिमेच्या यात्रोस्तवासाठी सौंदत्ती डोंगरावर वास्तव्यास गेले असून, आज गुरुवार (ता. 25) रोजी सकाळी साडेअकरा नंतर भाविकांच्या वतीने सामूहिक पडल्यांचा कार्यक्रम सौंदत्ती यल्लमा डोंगरावर मोठ्या उत्साहात पार पडला. श्री चांगळेश्वरी ट्रस्ट मंडळ, व समस्त गावकऱ्यांच्या वतीने हा पडल्या भरण्याचा कार्यक्रम उत्साही वातावरणात …
Read More »कंग्राळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
बेळगाव : येथील कंग्राळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने तिथीप्रमाणे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिवाजीराव गौन्डाडकर व माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर उपस्थित होते. सौ. शालन ज्योतिबा चौगुले यांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. पंच …
Read More »महापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडे दोन चेहरे!
बेळगाव : येत्या 5 फेब्रुवारीला बेळगावच्या विद्यमान महापौर आणि उपमहापौरांचा कार्यकाळ संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसच्या छावणीत राजकीय गणिते जोरात मांडली जात आहेत. 22व्या टर्मसाठी महापौरपद एससी महिला, उपमहापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. 58 सदस्यांपैकी 35 सदस्यांचे स्पष्ट …
Read More »भारत विकास परिषदेतर्फे विवेकानंद जयंती
मकर संक्रांती – श्रीराम मंदीर आनंदोत्सव बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती, मकर संक्रांती व श्रीराम मंदीर आनंदोत्सव असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रारंभी स्वामी विवेकानंद, श्रीराम आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. श्रीशा व स्वरा …
Read More »कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पुन्हा भाजपमध्ये परतले
बेंगळुरू : देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजप आता कर्नाचकात ऍक्शनमोडमध्ये आली आहे, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री शेट्टर भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. शेट्टर हे कर्नाटकातील लिंगायत समाजातील मोठे नेते आहेत. माजी …
Read More »अंधश्रद्धेचा कळस! कॅन्सरग्रस्त 5 वर्षांच्या मुलाला गंगेत बुडवलं, चिमुकल्याचा मृत्यू
हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. गंगेत बुडून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. दिल्लीतील एक कुटुंब आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्यासह हरिद्वारला हरकी पायडी येथे गंगेत स्नान करण्यासाठी आलं होतं. यावेळी येथे मुलाचा मृत्यू झाला. याचा एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल …
Read More »शालेय फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण
बेळगाव : टिळकवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी युवक संघटना, शिवाजी काॅलनी यांच्यातर्फे शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे 26 जानेवारी रोजी सकाळी लेले मैदानावर सुरू होणार आहेत. अंतिम सामने रविवारी 28 जानेवारीला खेळवले जाणार आहेत. सलग तीन दिवस या स्पर्धा बघायला मिळणार आहेत. या स्पर्धेत निमंत्रित शालेय फुटबॉल …
Read More »भीषण अपघातात लहान मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
चित्रदुर्ग : चित्रदुर्ग जिल्ह्यातील छळ्ळकेरे तालुक्यातील सानिकेरेजवळील पुलावर कार आदळून झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील तीन मुलांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलावर आदळल्याने ही भीषण दुर्घटना घडली. 2 वर्षांची सिंधुश्री, 5 महिन्याचा हयालप्पा, 3 महिन्याची रक्षा आणि 26 वर्षांची …
Read More »हलशीवाडी येथे भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने शुक्रवार ता. 26 जानेवारी ते रविवार ता 28 पर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून हाफ पीच (सर्कल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील विठ्ठल मंदिर समोरील मैदानात क्रिकेट स्पर्धा होणार असून स्पर्धा एक गाव एक संघ असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला १११११ उज्वला संभाजीराव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta