Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

‘सांजड’ कथासंग्रहाला शिवार प्रतिष्ठानचा ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ घोषित

  निपाणी (वार्ता) : प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी कृषक संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यकृतीला मागील एकवीस वर्षांपासून ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ दिला जातो. यावर्षी २२ वा पुरस्कार निपाणीच्या कन्या आणि सध्या कोल्हापूर येथील रहिवासी सुचिता घोरपडे यांच्या ‘सांजड’ या कथासंग्रहास घोषीत करण्यात आला आहे. …

Read More »

निपाणी सटवाई मंदिरात दिपोत्सव

  निपाणी (वार्ता) : येथील सटवाई रोडवरील सटवाई मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. श्रीमंत दादाराजे देसाई -निपाणकर सरकार यांच्या हस्ते देवीसह समईचे पूजन करून दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर भक्तांनी मंदिर परिसरामध्ये असलेल्या पणत्या लावून सटवाई मंदिर परिसर उजळून टाकला. यावेळी दादाराजे देसाई यांचा अजित जाधव यांच्या हस्ते सत्कार झाला. महाआरती झाल्यानंतर …

Read More »

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळतर्फे दीपोत्सव

  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ,शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर शिवाजी चौकातील नागरिकातर्फे परिसरात दिवे लावण्यात आले. उत्तम पाटील यांना कर्नाटक राज्य शासनाकडून सहकाररत्न पुरस्कार …

Read More »

लोकअदालतीत तब्बल ६ जोडपी रेशीम गाठीत

  नव्याने थाटला पुनर्संसार; निपाणीत अनेक प्रकरणे निकाली निपाणी (वार्ता) : निपाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत समुपदेशन केल्यानंतर चार घटस्फोटीत तर घरगुती भांडणातून विभक्त झालेल्या दोन अशा सहा जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची पूर्तता करून या जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला. यामध्ये …

Read More »

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन : डॉ. दबाडे

  बेळगाव : सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटक या संस्थेतर्फे येत्या सोमवार दि 11 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौध येथे सरकारला सादर केले जाणार आहे, अशी माहिती धारवाडचे ईएनटी सर्जन डॉ. गोपाळ दबाडे यांनी दिली. …

Read More »

बेळगाव विभागीय प्राथमिक शालेय फुटबॉल संघ उपविजेता

  बेळगाव : कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते बेंगलोर यांच्या विद्यमानाने कर्नाटक राज्यस्तरीय प्राथमिक आंतरशालेय मुलींच्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत बेळगाव विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूलच्या प्राथमिक मुलींच्या संघाने अतुलनीय कामगिरी करताना स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. बेंगलोर येथील झालेल्या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बेळगाव विभागीय संघाला चुरशीच्या लढतीत म्हैसूर विभागीय संघाकडून चुरशीच्या …

Read More »

खानापूर वकील संघटनेचे उद्या काम बंद आंदोलन

  खानापूर : विजयपूर येथे वकिलाचा निर्घृण खून करण्यात आल्यामुळे खानापूर बार असोसिएशनच्यावतीने सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी वकिलांनी काम बंद आंदोलन छेडले असून न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. त्यादिवशी कोणत्याही प्रकारच्या खटल्याची सुनावणी तसेच निकाल देऊ नये, यासाठी बार असोसिएशनच्यावतीने खानापूर न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवेदन दिले आहे. 8 डिसेंबर …

Read More »

१३ संशयित दहशतवाद्यांना अटक

  एनआयची कारवाई; बंगळूरसह पुणे, ठाणे, भाईंदरमध्ये छापे बंगळूर : जागतिक दहशतवादी संघटना ‘इसिस’ देशाच्या अनेक भागांत तोडफोडीची कृत्ये करण्याचा कट रचत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात ४४ हून अधिक ठिकाणी अचानक छापे टाकले. १३ संशयित दहशतवाद्याना ताब्यात घेतले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकात १, पुण्यात …

Read More »

दूधगंगेवरून पाणी योजना राबविणे चुकीचे

  माजी आमदार काकासाहेब पाटील : पाणी प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने २५ नगरपालिकांना अमृत योजनेतून पिण्याच्या पाण्यासाठी ३२ कोटी ८६ लाख इतके अनुदान दिले आहे. या अनुदानाचा योग्य उपयोग होऊन त्याचा निपाणी शहरवासीयांना लाभ व्हावा, अशी मागणी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केली. शनिवारी (ता.९) दुपारी …

Read More »

समर्थ नगर पहिला क्रॉस येथे चिमुकल्यानी साकारलेल्या कोंढाणा किल्ल्याचे उद्घाटन

  बेळगाव : समर्थ नगर पहिला क्रॉस येथे मीनाताई बेनके यांच्या हस्ते चिमूकल्यानी साकारलेल्या कोंढाणा किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी मीनाताई बेनके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे उद्घाटन केले. यावेळी चिमुकल्यांनी साकारलेल्या संपूर्ण किल्ल्याची माहिती यांना दिली. यावेळी चिमुकल्यांना छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »