Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

रुमेवाडी-अनमोड रस्त्यासाठी सोमवारी विविध संघटनांच्यावतीने निवेदन

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने गेल्या बैठकीतील ठरावाप्रमाणे खानापूर अनमोड व्हाया हेम्माडगा रस्ता पुनर्बांधणी करण्याबाबत तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० वाजता निवेदन देण्यात येणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील रुमेवाडी, शेडेगाळी, हारूरी, ढोकेगाळी, मणतुर्गे, तिवोली, देसाईवाडा, अशोकनगर, तेरेगाळी, …

Read More »

निपाणीत नविन तलाव निर्मितीला हिरवा कंदील

  माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर : निपाणीत बैठक निपाणी (वार्ता) : शहराच्या लकडी पुलापासून १०० एकर जागेत नव्या तलाव निर्मितीचा प्रस्ताव आहे. यासाठी १७५ कोटी रुपयांची आवश्यकता असून हा प्रस्ताव पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली दिला …

Read More »

माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांना आनंदवाडी कुस्ती स्पर्धेसाठी निमंत्रण

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे दरवर्षी प्रमाणे आनंदवाडी कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे. तेरा व चौदा जानेवारीला राज्यस्तरीय गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. हिंदवाडी येथील आखाड्यात स्पर्धा संपन्न होणार आहेत. कुस्तीची आवड निर्माण व्हावी. तरुणवर्गाने खेळाकडे वळावे याच उद्देशाने गेली तेरा …

Read More »

जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा सचिवपदी मुबीन अब्दुलअजीज मुजावर यांची निवड

‌ बेळगाव : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष के. अब्दुल जब्बार यांच्या मान्यतेने आणि के.पी.सी.सी. अध्यक्ष डी. के. शिवकुमार, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी व जिल्हा ग्रामीण काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष राजा सलीम काशीमनवर यांनी मुबीन अब्दुलअजीज मुजावर यांना …

Read More »

दत्त जयंतीनिमित्त आडीत १८ पासून परमाब्धि महोत्सव

  आठवडाभर विविध कार्यक्रम : देशभरातील साधुसंतांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील आडी येथील संजीवनगिरी डोंगरावरील श्रीदत्त देवस्थान मठात श्रीदत्त जयंतीनिमित्त सोमवार (ता. १८) ते मंगळवार (ता. २६) अखेर परमाब्धि विचार महोत्सव होणार आहे. आहे. त्यानिमित्त आठवडाभर प्रवचन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या काळात देशभरातील साधुसंतांची उपस्थिती …

Read More »

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी निरंतर लढा

  राजू पोवार; निपाणी तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या पिकाला खर्चाच्या तुलनेत दर मिळावा, अतिवृष्टी पूर परिस्थिती काळातील नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. या पुढील काळात संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. …

Read More »

छ. शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी ‘नवहिंद क्रीडा केंद्रा’ची 5 लाखची देणगी

  येळ्ळूर : हिंदुस्थानचे आराध्यदैवत छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या आपल्या येळ्ळूर गावात महाराजांची पंचधातूची मूर्ती स्थापन व्हावी, ही गावकऱ्यांची ईच्छा पूर्णत्वाच्या मार्गावर असून आज खऱ्याअर्थाने ‘नवहिंद परिवारा’ने दिलेल्या 5 लाख रुपयांच्या भरघोस देणगीने शिक्कामोर्तब झाले आहे. ‘नवहिंद’ने आधुनिक येळ्ळूर गावच्या जडणघडणीत आपलं योगदान दिले आहेच. आज खरोखर आम्ही …

Read More »

बेळगावात 64 व्या जिल्हास्तरीय फळ व पुष्प प्रदर्शनाला प्रारंभ

  बेळगाव : कर्नाटक शासन, बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, फलोत्पादन विभाग, ग्रामीण व लघु उद्योग विभाग, कृषी विभाग, जिल्हा फलोत्पादन संघ, जिल्हा कृषक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावातील क्लब रोडवरील ह्युम पार्क येथे आयोजित 64 व्या जिल्हास्तरीय फळ व पुष्प प्रदर्शन व औद्योगिक उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री सतीश जारकीहोळी …

Read More »

कर्नाटक संभ्रम उत्सव 12 डिसेंबर रोजी

  बेळगाव : म्हैसूर राज्याचे ‘कर्नाटक’ असे नामकरण होऊन 2023 मध्ये 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता “कर्नाटक संभ्रम-50” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णविधानसौधच्या प्रांगणात केल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर आणि विधान …

Read More »

कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका

  नवी दिल्ली : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक …

Read More »