बेळगाव : बेळगावमधील गरजू आणि गरीब चर्मकार समाजबांधवाना प्रोत्साह फौंडेशनच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले. प्रोत्साह फौंडेशनचे प्रमुख जीएसटी उपायुक्त चंद्रकांत लोकरे, पदाधिकारी बीएसएनएलचे डेप्युटी सर व्यवस्थापक मल्लीकार्जुन ताळीकोटी, थोर सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांच्या उपस्थितीत किटचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी समाजाचे युवा नेते संतोष होंगल, प्रजा नेरळुचे संपादक सागर कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण, रवि होंगल, संजु चौगले, शिवाजी पवार, पंडीत पवार, परशराम कांबळे, शंकर कांबळे, शंकर शिंदे आदी प्रमुख समाज बांधव उपस्थित होते.