Friday , October 23 2026
Breaking News

टिप्परला एसटी बसची मागून धडक; चालकाचा जागीच मृत्यू, १२ प्रवासी गंभीर

Spread the love

 

संकेश्वरजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; जखमींना बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले

बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर टिप्परला मागून एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर १२ प्रवासी गंभीर जखमी झाले. संगप्पा तळवार असे मृत चालकाचे नाव असून, ते गदग जिल्ह्यातील रोण तालुक्यातील सावदी गावचे रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगावती येथून बेळगावमार्गे कोल्हापूरकडे जाणारी ईशान्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस संकेश्वरजवळ आली असता हा अपघात घडला. बसची टिप्परच्या मागील बाजूस जोरदार धडक बसल्याने चालक संगप्पा तळवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या अपघातात १२ प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने संकेश्वर तालुका रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. त्यापैकी अधिक उपचारांची गरज असलेल्या जखमींना बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या अपघाताचा पुढील तपास संकेश्वर पोलीस करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *