Saturday , December 13 2025
Breaking News

मुसळधार पावसाने शेतकर्‍यांच्या भाजीपाल्यासह रब्बीचेही नुकसान

Spread the love

बेळगाव : गेल्यावर्षी खरिप हंगाम लांबल्याने रब्बीची पेरणी पुढे गेली त्यात खराब हवामानाने तसेच अवकाळी पावसाने रब्बी पीकंही गेली. या भागातील प्रसिद्ध मसूर पीकं तर सपशेल गेली त्यात खरबूस, काकडी, दोडकी इतर वेलवर्गीय पीकंही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. अनेक शेतकर्‍यांनी तिसरी पीकं कोथिंबीर, मेथी, लालभाजी, भेंडी, कोबिज, टोमॅटो, बीट, वांगी, मीरचीसह इतर पीकं घातली पण अवकाळी व कालपासूनच्या पावसाने तर उरलीसुरली शेतकर्‍यांची आशाही मातीत मिळाली. ऐन काढणीसाठी आलेल्या कोथिंबीर, मेथीसह इतर भाजीपाल्यात पाणी भरल्याने ती कूजूनच जाणार. सगळा खर्च वाया. रब्बी पीकांत असलेले जोंधळा पीकंही त्याची कणस काळी पडल्याने बादच झाली.
आता पूढे येणारा खरिप हंगाम असल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील मशागतही पावसाने बंद पडली, शेणखत पसरणे, बांधावर माती घालणे हि थांबलेच. त्यामूळे आता खरिप हंगाम लांबल्याने असाच पाऊस झाल्यास पेरण्याही ठप्प आणि भात लावणी करण्यासाठी शेतकर्‍यांना एकरी पन्नास हजारच्या वर खर्च कुठून करायचा याच विवंचनेत शेतकरी चिंतेने त्रस्त झालाय. कारण लावणीचे भात घालायच म्हटल कि रोजच पडत असणार्‍या पावसाने बियाणं नष्ट होतात. त्यासाठी उंचवट्याची जागा हवी. त्यानंतर भात लावणीसाठी एकरी आठ/दहा हजार, खतांच्या किमती वाढल्याने ती चिंता वेगळीच अशाने शेतकरी वैतागलाय.
बँकेत शेतीसाठी कर्ज मागायला गेल्यास किसान क्रेडिट कार्ड असावे लागते पण ते मागायला गेल्यास बँकेचे अधिकारी शेतकर्‍यांना थातुरमातुर उत्तर देऊन परत पाठवतात. वास्तविक पहाता बँक अधिकारी व संबंधित शेती अधिकार्‍यांनी ज्यांच्या नावे शेती आहे त्या शेतकर्‍याच्या घरापर्यंत जाऊन क्रेडिट कार्ड दिल पाहिजे. पण खरे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळायची सोडून संबंधित अधिकार्‍यांना चिरिमिरी जे शेतकरी देतील आणि प्रत्यक्ष नुकसानच झाले नाही अशा शेतकर्‍यांना भरपाई दिली जाते. तशीच स्थिती किसान क्रेडिट कार्डाची आहे. असो पण आतातरी सरकारने जागरुक होऊन प्रामाणिकपणे गांभीर्य राखून शेतकर्‍यांना त्यांचा बांधावर जाऊन आर्थिक मदत देण्याची कुवत असेलतर द्यावी अन्यथा बाधांवर जाऊन किसान क्रेडिट कार्ड देऊन त्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करणार कि परत बोळवण करुन धन्यास कण्या, चोरास मलिदा देणार?

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *