बेळगाव : बेळगाव शहरात गुरुवारी जोरदार पाऊस पडला आहे. वादळी वारा आणि पावसाच्या वाढत्या जोरामुळे शहरात अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरु झाले तसेच सखल भागात पाणी साचल्याचेही दिसून आले. सकाळपासून उन्हाच्या झळा तीव्र जाणवत असूनही अचानक दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. निरंतर अर्धा पाऊण तास पडलेल्या पावसामुळे बेळगाव शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे.
पावसानंतर काही वेळातच रस्त्यावर पाणी साचले आणि संपूर्ण शहरात नागरिकांची तारांबळ देखील उडाली. पावसाचा जोर वाढल्याने गटारीतून पाणी बाहेर वाहून रस्त्यावर येऊ लागले. गटारीत पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी वाढली. शहरातील चव्हाट गल्ली आणि शेट्टी गल्ली येथील गटारींमधून वेगाने पाणी रस्त्यावर येतानाचे चित्र दिसून आले. अशा समस्या नेहमीच उद्भवत असल्याने चव्हाट गल्ली आणि शेट्टी गल्ली येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरात सातत्याने गटारी भरून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी वाहते. याबाबत पालिका अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. परंतु कोणीही या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही. या समस्येवर पावसाळा सुरु होण्यापूर्वी उपाय शोधावा असे आवाहन स्थानिकांनी केले आहे. याचप्रमाणे मारुती गल्ली, गणपत गल्ली, रविवार पेठ आणि कांबळी खूट परिसरात देखील पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले दिसून आले. रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पाण्यातून वाट काढणे नागरिकांना त्रासदायक ठरत होते.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …