Monday , September 21 2026
Breaking News

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा

Spread the love

सुरेश मुळे यांची नितिन गडकरी यांच्याकडे मागणी
जालना (प्रतिनिधी) : परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी ब्रम्ह महाशिखर परिषदेचे अध्यक्ष सुरेश मुळे व सखाराम कुलकर्णी यांनी आज दि. 2 जुन गुरुवार रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी यांची भेट घेऊन केली. ब्राह्मण समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक बाजू कमकुवत असल्याने ब्राह्मण समाजाच्या मुला – मुलींना शिक्षण घेता येत नाही. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्यास महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून पुढे शिक्षण घेता येईल व विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल.पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा अशी मागणी ब्रह्म महाशिखर परिषद अध्यक्ष सुरेश मुळे व सखाराम कुलकर्णी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सदिच्छा भेटीत केली. यावेळी राष्टीय कमिटी बहुभाषीय ब्राह्मण महासंघ आदी
पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *