बेळगाव : महाराष्ट्रातील रायगडावरील श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभागतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभागतर्फे आज सोमवारी सकाळी शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीच्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि उपतालुका प्रमुख अनंत पाटील (चंदगड) यांच्या हस्ते सिंहासनारूढ छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम व प्रकाश राऊत यांच्यासह प्रदीप सुतार, विठ्ठल मेलगे, ओमकार गोखले, शिवम लाड, विनायक जाधव आदी बरेच शिवसैनिक हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta