Thursday , March 5 2026
Breaking News

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक उद्या

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक बुधवार दि. 8 जुन रोजी मुंबई येथे होणार आहे. सीमाप्रश्नी दाव्यावर तात्काळ सुनावणी व्हायला हवी यादृष्टीने कोणते प्रयत्न केले पाहिजे यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला बेळगाव येथून ज्येष्ठ नेते या ऍड. राम आपटे, ऍड. राजाभाऊ पाटील तसेच तज्ञ समिती सदस्य दिनेश ओऊळकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मध्यवर्ती म. ए. समितीचे पदाधिकारीही मुंबईला जाण्याची शक्यता आहे.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर तज्ञ समिती अध्यक्ष पद रिक्त होते. कोरोना काळात कामकाजात शिथिलता आली होती. आता या रिक्त जागेवर महाराष्ट्र चे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर होणारी ही पहिलीच बैठक आहे.
जयंत पाटील यांच्याशी बेळगावचे खूप जवळचे संबंध आहेत. जयंत पाटील हे सांगली जिल्ह्याचे असल्यामुळे सातत्याने त्यांच्या संपर्कात राहता येते. त्यामुळे दाव्यांच्या चालनेसोबत सीमावासीयांचा इतर अडचणीवरही त्यांच्याशी चर्चा करता येणार आहे. आता बुधवारी होणाऱ्या बैठकीत कोण कोणते निर्णय घेण्यात येणार आहेत याकडे सीमावासीयांचे लक्ष लागून राहिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *