Monday , September 21 2026
Breaking News

असहाय्य घुबडाला जीवदान!

Spread the love

बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील आणि त्यांचे सहकारी सचिन अष्टेकर, कीर्ती टोपे व अनिल गोडसे यांनी आज एका जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबडाला जीवदान दिल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये त्यांची प्रशंसा होत आहे.

सतीश पाटील आणि त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे सकाळी सायकलिंगला जाताना झाडशहापूर नजीक जखमी अवस्थेत एक घुबड रस्त्याशेजारी पडले होते. जखमी असहाय्य अवस्थेत पडलेल्या त्या घुबडाकडे लक्ष जाताच सायकलींगसाठी निघालेल्या सायकलपटुंनी त्याला लगेच उचलू सुरक्षित जागेला ठेवले. त्यानंतर गाडी आणून येळ्ळूरला आणून त्यावर प्रथमोउपचार केले. तसेच वनखात्याच्या अधिकाऱ्यांना बोलून घेऊन ते घुबड नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी त्यांच्या स्वाधीन केले. यावेळी येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्रा. पं. सदस्य आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. वन खात्याच्या वतीनं मोहम्मद किल्लेदार यांनी घुबड घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *