जागतिक नेत्रदानदिनादिवशीच जायंट्स आय फौंडेशनचे कार्य
बेळगाव : चन्नम्मानगर येथील रहिवासी सुमन चंद्रशेखर मठद (६१) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले.
निधनाची बातमी समजताच त्यांचे मुलगे प्रसाद मठद यांना मदन बामणे यांनी नेत्रदानाविषयी माहिती दिली आणि आपल्या आईच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना ही सृष्टी पाहता येईल असे सांगितले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रसाद यांनी होकार दिला. लागलीच मदन बामणे यांनी केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधून माहिती दिली. यावेळी डॉ. यशा सवानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
जागतिक नेत्रदानदिनादिवशीच सुमन मठद यांनी केलेल्या नेत्रदानामुळे जायंट्स आय फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून मठद कुटुंबियांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta