Thursday , March 5 2026
Breaking News

कै. मैनाबाई फाउंडेशनच्यावतीने गरजूंना मदत

Spread the love

बेळगाव : समाजातील गरजू आणि गोरगरीब यांच्या मदतीसाठी कै. मैनाबाई फाउंडेशन स्थापन करण्यात आले आहे.
या फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. उपचाराची गरज असणार्‍या गरीब व्यक्तींना आर्थिक मदत, रुग्णवाहिका सेवा, महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गँगवाडी भागातील मुलासाठी बालवाडी सुरू करून त्यांना शिक्षण दिले जाणार आहे. परिसरातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी तज्ज्ञ डॉकटर निमंत्रित करून मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न मी फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहे असे उद्गार कै. मैनाबाई फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते शिवा चौगुले यांनी काढले.
कै. मैनाबाई फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात शिवा चौगुले बोलत होते. फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण शहरात विविध उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती शिवा चौगुले यांनी दिली.
कै. मैनाबाई फाउंडेशनतर्फे मैनाबाई चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पन्नासहून अधिक विधवा आणि ज्येष्ठ महिलांना महिलांना साडी, चोळी देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण देखील करण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून शिवा चौगुले यांनी केले.
यावेळी सीमा चौगुले, गजानन खुदाजी सकट, किशन गोपी चौगुले, गणेश लक्ष्मण देडे, अमित लिंबाजी चौगुले, लखन बाबुराव गायकवाड, विनायक रंधवा सकट आणि कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *