बेळगाव : कर्जबाजारी झाल्याने भारत नगर येथील एका विणकराने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. कल्लाप्पा रुद्रप्पा सोनटक्की उर्फ कुकडोळी (५८, रा. भारत नगर, हमालवाडी, बेळगाव) असे त्यांचे नाव आहे.
स्वतःचे घर आणि विद्युत यंत्रमाग विकून कर्जबाजारी झाल्याने ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी खासगी बँकेकडून सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांना पत्नी, एक मुलगा, चार मुली आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta