Monday , December 15 2025
Breaking News

आगामी निवडणूकीत काँग्रेस जोमात उतरणार!

Spread the love

बेळगाव : मागील विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव पत्करलेल्या मतदारसंघात काँग्रेस पुन्हा जोमात उतरणार असून कागवाड, गोकाक, रामदुर्ग, सौन्दत्ती, अथणी, कुडची आणि रायबाग, बेळगाव उत्तर आणि आरभावी मतदारसंघात लिंगायत उमेदवार देण्याचा विचार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करत आहेत.
2023 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 18 मतदारसंघासाठी काँग्रेसने आतापासूनच संपर्क वाढवला आहे.
काँग्रेस – जेडीएस सरकारमधील काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी करून पुन्हा भाजपकडून निवडणूक लढविली आणि जिल्ह्यात भाजपचा विजय हा काँग्रेससाठी निराशाजनक ठरला. त्यामुळे मतदारसंघात विकासकामांचे हत्यार वापरून काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यास सुरूवात केली आहे.
आघाडी सरकार पाडून राज्यात भाजपची सत्ता आणणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या मतदारसंघात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार असण्याची शक्यता आहे. कारण रमेश जारकीहोळी यांनी भाजप तर लखन जारकीहोळी यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. या दोघांच्या लढाईत जेडीएसचे अशोक पुजारी यांनी रिंगणात उतरून दोन्ही बलाढ्य पक्षांना हादरा दिला होता. गोकाक मतदारसंघातील त्रिकोण लढतीत रमेश जारकीहोळी हे अत्यल्प मतांनी विजयी झाले होते. त्याचे बळ अशोक पुजारी यांना मिळाले असून पुढील निवडणूक चुरशीची होणार आहे. काँग्रेस आणि लिंगायत मते यामुळे पुजारी यांचे मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचे तगडे नेते सतीश जारकीहोळी देखील संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात नजर ठेवून आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *