Sunday , July 26 2026
Breaking News

झोपडपट्टी भागात लवकरच घरे बांधून देणार : आमदार अनिल बेनके

Spread the love

बेळगांव : आज शनिवार दिनांक 02 जुलै 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी झोपडपट्टी भागाला भेट दिली आणि तेथे असलेल्या जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शहरातील वंटमुरी आणि वैभव नगर येथे नागरिकांच्या झोपडपट्टींची पाहणी करुन त्यांना लवकरात लवकर घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले.
सध्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याने झोपडपट्टी भागात दलदलीचे साम्राज्य निर्माण होऊ नये तसेच त्यांना कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागू नये याकरिता झोपडपट्टी विभागाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत झोपडपट्टी विकास विभागाचे अधिकारी लमानी, महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, नगरसेवक राजशेखर डोनी, लक्ष्मी राठोड चिखलदिनी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *