बेळगाव : शहापूर क्रीडा स्पर्धा 17, 18 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय कॅम्पमधील व्ही. जी. मॉडेल स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शहराच्या पीईओ जे. बी. पटेल, माजी पीईओ एल. बी. नाईक, शहर माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, साधना बद्री, व्ही. जी. मॉडेलच्या उपप्राचार्या कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजनाची जबाबदारी न्यू गांधींनगरमधील सरकारी उर्दू माध्यमिक शाळेवर सोपविण्यात आली आहे. स्पर्धा 17 व 18 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात येणार आहेत. यासाठी विभागीय शालेय संघानी आपली प्रवेशिका 21 जुलै पुर्वी आयोजक शाळेकडे जमा करायचे आहे. सांघिक खेळांना 1 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या बैठकीला शहापूर विभागातील विविध शाळांचे क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta