बेळगाव : एंजल फाउंडेशनच्यावतीने भांदूर गल्ली येथे डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून त्यामध्ये डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे . डेंग्यू व चिकनगुनिया या रोगांचेही प्रमाण वाढत आहे. याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला एंजल फाउंडेशनचे अध्यक्ष मीना बेनके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यानंतर भागातील सर्व लोकांना डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस पाजण्यात आली.
याप्रसंगी सुप्रिया शिंदोळकर, सुधा महागावकर, पंकज चौगुले, रजनी मेंडके, मनोहर पै, केशव शिंदोळकर, देवदत्त शिंदोळकर, संदीप पै, सतीश कारेकर, संजू बद्रे, राजू चौगुले यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta