Thursday , March 5 2026
Breaking News

कृष्णा व उपनद्यांची पाणी पातळी स्थिर

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व उपनद्यांची पाणी पातळी स्थिर आहे.
गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील कोकण भागात वरुणराजाने कहर केला आहे. कृष्णा नदी व तिच्या उपनद्या, वेदगंगा व दूधगंगा नद्यांना पूर आला होता. परंतु कालपासून महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांची पाणीपातळी स्थिर असून कल्लोळ कृष्णा नदीतून 27120 क्युसेक्स आणि 129370 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संभाव्य पुराच्या संकटात सापडलेल्या नदीकाठच्या नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *