Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलला केंद्राचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार

Spread the love

 

बेळगाव : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्‍या स्वच्छ विद्यालय अभियानात सहभागी झालेल्या बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वच्छ भारत अभियानात सर्व शाळांचा समावेश करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सहभागी होण्याची संधी दिली होती. त्यात बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलचाही सहभाग होता. शिंदोळी पब्लिक स्कूलमध्ये स्वच्छ व नीटनेटक्या वर्गखोल्या, स्वच्छ परिसर, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छ वातावरण आणि स्वच्छ हात धुण्याची सोय आहे. त्यामुळे 4 स्टार रेटिंगसह 82% गुण या शाळेला देण्यात आले. शाळेतील शिक्षक आणि कामगारांच्या कर्तव्यदक्षतेमुळे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यात शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री रेवशेट्टी यांचेही योगदान आहे. बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलने जिल्ह्यातील सर्वात स्वच्छ शाळेचा पुरस्कार पटकावला आहे. शाळेचे संचालक डॉ. शिवकुमार रेवशेट्टी यांनी हा स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्वीकारला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *