बेळगाव : कावळेवाडी (बेळगाव) येथील उदयोन्मुख कुस्तीपटू कु. रवळनाथ कणबरकर याने नुकताच शालेय कुस्ती स्पर्धेत कडोली येथे आयोजित केलेल्या तालुका पातळीवर प्रथम येण्याचा मान मिळवला.
17 वयोगटाखालील 65 वजन गटात त्याने हे घवघवीत यश संपादन केले.
बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी या शाळेत आठवीत तो शिकत आहे. सध्या सावगाव मठपती कुस्ती आखाड्यात सराव करीत आहे. जिल्हापातळीवर त्याची निवड झाली आहे. त्याच्या या अभिनंदनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta