बेळगाव : सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मी महाराष्ट्र सरकारचा सीमा प्रश्नी नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे म. ए. समितीने आमंत्रित केलेल्या महामेळाव्याला मी सोमवारी बेळगावला येत आहे. माझ्या सोमवारच्या बेळगाव दौऱ्या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी. असे विनंती वजा पत्र खासदार आणि सीमा प्रश्नी नेमण्यात आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांनी बेळगाव पोलीस प्रशासनाला पाठविले आहे.