Thursday , March 5 2026
Breaking News

स्मशानभूमीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहराच्या सदाशिवनगर येथील स्मशनभूमीत गेल्या 43 वर्षापासून सेवा बजावणाऱ्या मल्लाप्पा धुंडपणावर यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.

सदाशिवनगर स्मशानभूमी सुधारणा मंडळच्या वतीने महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ तसेच माजी नगरसेवक बाबूलाल मुजावर नगरसेवक शंकर पाटील, युवा समाजसेवक आर्यन मोरे, माजी महापौर विजय मोरे यांच्या हस्ते मल्लाप्पा यांचा शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करून सन्मानपूर्वक त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी कोविड काळामध्ये सदाशिवनगर स्मशानभूमी तसेच बेळगाव शहरांमधल्या सर्व स्मशानभूमीत काम केलेल्यांचा कौतुक करून शंकर पाटील, गंगाधर पाटील यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. बेळगाव शहरांमध्ये कोणत्याही बेवारस मृतदेहावर अंतिमसंस्कार यांच्या सहकार्यातून केलं असून बेळगाव शहरांमध्ये 928 जणांचा अंतिमसंस्कार यांच्या मदतीने केले असल्याचे नमूद केले. कोणतीही अपेक्षा न बाळगता सदाशिवनगर स्मशानभूमीत कार्य केलेल्या मल्लाप्पा धुंडपणावर यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सागर शेळके, गंगाधर पाटील, ओमकार कांबळे, सुरज गवळी आणि मल्लाप्पाचे हितचिंतक उपस्थित होते. शेवटी शंकर कोलकार यांनी आभार व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *