बेळगाव : उचगांव येथील ही मळेकरणी क्रेडीट सौहार्द सहकारी नि. उचगाव यांच्यावतीने सालाबादपमाणे 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान जवाहर देसाई हे होते. यांच्या अमृतहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन अँड. अनिल पावशे यांनी केले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन श्री. उमेश घुमेह यांनी केले. दिपप्रज्वलन निवृत सैनिक संजय कुरबर, शांताराम पाटील किशोर पावशे, लुमाण्णा पावशे, पवन देसाई, कविता जाधव, प्रताप देसाई, जोसेफ फर्नाडीस यांनी केले. कार्यक्रमास सर्व संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta