Sunday , December 14 2025
Breaking News

मराठी विद्यानिकेतनच्या संस्कार शिबिराचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक रायगड येथे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगावच्या इयत्ता 9 वी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल व शिबिराचे आयोजन दिनांक 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आले होते. हे संस्कार शिबिर रायगड येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर या ठिकाणी संपन्न झाले. दरवर्षी मराठी विद्यानिकेतन बेळगावच्या वतीने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक सहलीचे व शिबिराचे आयोजन केले जाते रायगड जिल्ह्यातील वडघर या ठिकाणी असलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये विद्यार्थी संस्कार व व्यक्तिमत्व विकासाचे धडे घेतात व जवळ असणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या शैक्षणिक सहलीमध्ये प्रथमता विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथील गणपतीपुळे व गणपतीपुळेच्या जवळच असलेल्या मालगुंड येथील केशवसुत स्मारकाला भेट दिली. केशवसुत मराठीतील आधुनिक कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी असलेल्या साहित्यसंपदेचा आस्वाद घेतला. यानंतर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी एक दिवसीय संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिर झाले. साने गुरुजींच्या विचाराने भारलेल्या या स्मारकात विद्यार्थ्यांनी सुनागरिकत्वाचे धडे गिरविले या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये देवरुख येथील श्री संजय भंडारी यांनी गणित व विज्ञान विषयातील बेसिक गोष्टींवर मार्गदर्शन केले. भंडारी सर हे व्यवसायाने इंजिनियर होते पण त्यांनी आता सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी आपला पूर्ण वेळ दिलेला आहे. यानंतर पुण्याच्या अमोल काळे यांनी लिंगभाव जागृती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या शिबिराबरोबरच साने गुरुजी स्मारकातील साने गुरुजींच्या समग्र जीवनपटाचा अभ्यासही केला. यानंतर पुढील दोन दिवस विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ला रायगड, महाडचे चवदार तळे, बौद्धकालीन लेणी, गरम पाण्याचे झरे, प्रतापगड किल्ला व महाबळेश्वर येथील पंच नद्यांचे उगम स्थान यांना भेट दिली. या सहलीतून प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद व व्यक्तिमत्त्व विकास या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. सहल विभाग प्रमुख सुनील लाड यांनी सहलीचे नियोजन केले. शिक्षण संयोजिका नीला आपटे, मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, शिक्षक बी. एम. पाटील, सविता पवार, महेश हगिदळे, पूजा संताजी, पूजा प्रधान यांनी सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न केले.

About Belgaum Varta

Check Also

आरोपी मुख्याध्यापकास कठोर शिक्षा द्या; कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सेक्रेटरी डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकावर अनेक विद्यार्थिनींसोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *